
PAK vs SA: Quinton de Kock makes comeback, sets world record! He leaves Kohli and Williamson behind
Quinton de Kock sets world record : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना फैसलाबाद येथील इक्बाल स्टेडियमवर खेळला जात आहे. या निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संघाचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने पुन्हा एकदा फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून या कामगिरीसह त्याने भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सारख्या दिग्गज खेळाडूंना देखील पिछाडीवर टाकले आहे.
खरं तर, पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्विंटन डी कॉकने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ७००० धावांचा टप्पा गाठला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये हा टप्पा गाठणारा तो दुसराच खेळाडू ठरला आहे. डी कॉकने फक्त १५८ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीत त्याच्या पुढे असलेला एकमेव खेळाडू म्हणजे त्याचाच देशबांधव, महान हाशिम अमला, ज्याने १५० डावांमध्ये ही कामगिरी करण्याची किमया साधाली होती.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली १६१ डावांमध्ये ७००० धावा पूर्ण करून या यादीत आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन १५९ डावांमध्ये हा टप्पा पार केला होता. तो अजूनही तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. डी कॉकच्या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक खेळाडू आहे.
हेही वाचा : IND vs AUS 5th T20 : “जर मला संधी मिळाली…” मालिकावीर अभिषेक शर्माने उघड केले खास स्वप्न
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉकसाठी ही संपूर्ण मालिका विशेष राहिली. त्याने या तीन सामन्यांच्या मालिकेत आपल्या बॅटमने शानदार फलंदाजी केली, त्याने तीन डावांमध्ये ११९.५० च्या सरासरीने २३९ धावा फटकावल्या. त्याने दोन अर्धशतके आणि एक शानदार शतक देखील झळकवले.