भारताचे हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेतून आव्हान संपुष्टात(फोटो-सोशल मीडिया)
India out of Hong Kong Sixes Cricket : भारतावर सलग तीन पराभवांसह हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने शनिवारी त्यांचे सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताला एकाच दिवसात तीन पराभव पत्करावे लागले. कुवेतविरुद्धच्या पूल क सामन्यात भारताचा २७ धावांनी पराभव झाला आणि तो गटात तिसऱ्या स्थानावर राहिला.
हेही वाचा : IND vs AUS 5th T20 : “जर मला संधी मिळाली…” मालिकावीर अभिषेक शर्माने उघड केले खास स्वप्न
कुवेतने गटात अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला. १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताचा ७९ धावांवर सहा विकेट्सवर गारद झाला. कुवेतकडून यासिन पटेलने २३ धावांत तीन विकेट्स घेण्यात यश मिळवले. या निकालासह, पाकिस्तान आणि कुवेत क्वार्टर फायनलमध्ये पोहोचले, तर भारत बाउल सामन्यात पोहोचला. त्यानंतर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पाच विकेट्सने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरुद्ध बाउल स्टेज सामन्यात भारताचा संघर्ष सुरूच राहिला. अभिमन्यू मिथुन (१६ चेंडूत ५०) आणि दिनेश कार्तिक (१४ चेंडूत ४२) यांच्या जलद खेळी असूनही, भारत त्यांच्या १०८ धावांच्या धावसंख्येचे रक्षण करू शकला नाही आणि युएईच्या खालिद शाहने १४ चेंडूत ५० धावा फटकावत चार विकेटने विजय मिळवला.
त्यानंतर नेपाळने बाउल मॅचमध्ये भारताचा ९२ धावांनी पराभव केला. नेपाळने सहा षटकांत एकही बाद १३७ धावा केल्या आणि नंतर भारताला सहा विकेटने ४५ धावांवर रोखले. नेपाळकडून रसीद खानने १७ चेंडूत ५५ धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या. दरम्यान, बेन मॅकडमॉट (१४ चेंडूत ५१) आणि कर्णधार अॅलेक्स रॉस (११ चेंडूत ५०) यांच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला ५४ धावांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर ख्रिस ग्रीनने ३२ धावांत तीन विकेट घेतल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली. काल गॅबा येथे पाचवा टी२० सामना खेळवण्यात आला होता, परंतु या सामन्याला खराब हवामानाचा चांगलाच फटका बसला. सामना सुरू असताना पाउवसणे हजेरी लावली आणि त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला परिणामी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ अशी मालिका खिशात घातली.






