अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Statement from Man of the Series Abhishek Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची टी २० मालिका खेळण्यात आली. या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना आज खेळवण्यात आला. परंतु, खराब हवामानामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. परिणामी भारतीय संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत शानदार कामगिरी करणारा भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. अभिषेकने या आव्हानासाठी त्याने कशी तयारी केली आणि या मालिकेने त्याच्या कारकिर्दीत त्याला नवीन आत्मविश्वास कसा दिला याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.
हेही वाचा : हरमनप्रीत कौर ‘लेस्बियन’ असण्याचा दावा! सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टने उडवली खळबळ; नेमकं प्रकरण काय?
अभिषेक शर्माने स्पष्ट केले की त्याने ऑस्ट्रेलियनसारख्या परिस्थितीसाठी मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या स्वतःला तयार केले आहे. तो म्हणाला की ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्या आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळायचे माझे नेहमीच स्वप्न राहिले असळ्यूंचे त्याने म्हटले आहे. तो म्हणाला की, “मी या मालिकेची खूप वाट पाहत होतो. जेव्हा मला कळले की आम्ही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहोत. तेव्हा मी खूप उत्साहित झालो होतो. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत, मी पाहिले आहे की ऑस्ट्रेलिया फलंदाजीसाठी खूप अनुकूल राहिली आहे आणि मला अशा गोलंदाजांसाठी आणि परिस्थितीसाठी स्वतःला तयार करायचे होते.”
अभिषेकने पुढे स्पष्ट केले की सराव दरम्यान तो स्वतःला जागतिक दर्जाच्या गोलंदाजांसाठी तयार करत असतो. तो म्हणाला की एक चांगला क्रिकेटपटू बनण्यासाठी कठीण परिस्थितींना तोंड देणे गरजेचे असते. शर्मा पुढे म्हणाला की, “जर तुम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे असेल आणि तुमच्या संघासाठी चांगले प्रदर्शन करून दाखवायचे असेल तर तुम्हाला जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करावाच लागणार. मी अशा गोलंदाजांसाठी सराव करत होतो कारण अशा प्रकारे तुम्हाला खेळाडू म्हणून सुधारणा करता येतात.”
हेही वाचा : ‘यापुढे शोमध्ये क्रिकेटपटूला आमंत्रण नाही…’, करण जोहरचा विराट कोहलीबद्दल मोठा खुलासा, कारण बनले ‘हे’ खेळाडू
अभिषेक शर्मा पुढे म्हणाला की, ही मालिका त्याच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे आणि त्याने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पूर्णपणे तयारी करण्याचा संकल्प देखील केला आहे. अभिषेक म्हणाला की, “जर मला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली तर ते स्वप्न देखील पूर्ण होईल. लहानपणापासूनच मी नेहमीच भारतासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पहिले आहे. मी त्या स्पर्धेसाठी देखील तयार आहे याची खात्री करेन.”






