फोटो सौजन्य - ANI सोशल मीडिया
आर अश्विन : आयपीएल २०२५ चा सीझनचा आतापर्यत मध्यात आहे. सध्या आयपीएलचे सर्व सामने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. पण हा सिझन चेन्नई सुपर किंग्सच्या संघासाठी विसरण्यासारखा आहे. चेन्नईच्या संघाने या सीझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे संघ अर्धा सिझन झाल्यानंतर दहाव्या स्थानावर म्हणजेच पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. या सीझनमध्ये रविचंद्रन अश्विन याने देखील या सीझनमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. पण आज त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे.
२८ एप्रिल हा दिवस भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आर अश्विनसाठी खूप खास होता. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अश्विनला देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. २८ एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मोठ्या व्यक्ती देखील समारंभात उपस्थित होत्या. अश्विन आता हा मोठा सन्मान मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो ४० वा भारतीय क्रिकेटपटू ठरला. त्यांच्या आधी सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि गौतम गंभीर सारख्या दिग्गजांनाही हा सन्मान मिळाला आहे.
President #DroupadiMurmu confers the Padma Awards at Rashtrapati Bhavan.
Award: 𝐏𝐚𝐝𝐦𝐚 𝐒𝐡𝐫𝐢
R Ashwin
Field: Sports
State: Tamil Nadu#PeoplesPadma | #PadmaAwards | @rashtrapatibhvn | @ashwinravi99 pic.twitter.com/qHdkL3KOrw
— All India Radio News (@airnewsalerts) April 28, 2025
आर. अश्विनला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानले जाते. त्याने दीर्घकाळ आपल्या चमकदार कामगिरीने टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. अश्विनने गेल्या वर्षी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
जोफ्रा आर्चरने त्याचे नवीन बूट का कापले? कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का! पहा Video
तथापि, निवृत्तीनंतरही अश्विन आयपीएलमध्ये क्रिकेट खेळत आहे. तो सध्या आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे आणि लीगमध्ये त्याचा अनुभव दाखवत आहे. आर अश्विनने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२५ मध्ये अश्विनची आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिलेली नाही. तो सीएसकेसाठी फारसे काही करू शकलेला नाही.