Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Sports 2025: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘महाराष्ट्रा’चा बोलबाला; स्क्वॉशमध्ये दोन रौप्य तर एक कांस्य

अंजली ही मुंबई येथे जे एस डब्ल्यू वासिंद अकादमी प्रशिक्षण घेत असून तिने शिव नाडर विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्रात पदवी संपादन केली आहे. या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच वैयक्तिक पदक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2025 | 09:22 PM
38th National Sports 2025: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 'महाराष्ट्रा'चा बोलबाला; स्क्वॉशमध्ये दोन रौप्य तर एक कांस्य

38th National Sports 2025: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 'महाराष्ट्रा'चा बोलबाला; स्क्वॉशमध्ये दोन रौप्य तर एक कांस्य

Follow Us
Follow Us:

डेहराडून: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राहुल बैठा व अंजली सेमवाल यांना रौप्य, तर सूरज चंदने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राला स्क्वॉशमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवून दिले. राजीव गांधी स्टेडियममध्ये संपलेल्या स्क्वॅशमधील पुरुषांच्या एकेरीत महाराष्ट्राच्या राहुल याला आंतरराष्ट्रीय खेळाडू व अग्रमानांकित खेळाडू व्ही. सेंथिलकुमार याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. चुरशीच्या लढतीनंतर सेंथिलकुमार याने हा सामना 11-6,11-9,11-7 असा जिंकला. या लढतीमध्ये सेंथिल कुमार याने परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. राहुल याने क्रॉस कोर्ट फटके मारीत चांगली लढत दिली मात्र अखेर त्याला पराभव पत्करावा लागला.

महिलांच्या एकेरीत अंजली हिला गोव्याची खेळाडू आकांक्षा साळुंखे हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. एकतर्फी झालेल्या लढतीत आकांक्षा हिने 11-6,11-5,11-4 असा विजय मिळवताना चतुरस्त्र खेळाचा प्रत्यय घडविला. अंजली हिने परतीचे काही सुरेख फटके मारले. मात्र, आकांक्षाच्या वेगवान खेळापुढे तिला अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आला नाही.

राहुल हा व्यावसायिक खेळाडू असून, तो जे एस डब्ल्यू वासिंद अकादमीत सराव करीत आहे. आजपर्यंत या 24 वर्षे खेळाडूने अनेक पदके जिंकली आहेत. उपांत्य फेरीत पराभूत होणार्‍या सूरज याला कांस्यपदक बहाल करण्यात आले. तो देखील मुंबईचा खेळाडू असून सोमय्या महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे त्याने आजपर्यंत या स्पर्धांमध्ये सहा पदके जिंकली आहेत. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत त्याने सांघिक विभागात दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत.

हेही वाचा : 38th National Sports 2025: महाराष्ट्राच्या लेकीने केली आणखी एका पदकाची कमाई; सायकलिंगमध्ये जिंकले ‘रौप्य’

माझ्या साठी आज येथे मिळवलेले रौप्यपदकही महत्त्वाचे आहे कारण सेंथिल कुमार हा अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला मी लढत देऊ शकलो याचेच मला समाधान आहे. येथील अनुभव मला भावी कारकीर्दीसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे असे राहुल याने सांगितले.  महिलांच्या एकेरीत अंजली हिला गोव्याची खेळाडू आकांक्षा साळुंखे हिच्याकडून पराभव पत्करावा लागला एकतर्फी झालेल्या लढतीत आकांक्षा हिने 11-6,11-5,11-4 असा विजय मिळवताना चतुरस्त्र खेळाचा प्रत्यय घडविला. अंजली हिने परतीचे काही सुरेख फटके मारले मात्र आकांक्षाच्या वेगवान खेळापुढे तिला अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आला नाही.

अंजली ही मुंबई येथे जे एस डब्ल्यू वासिंद अकादमी प्रशिक्षण घेत असून तिने शिव नाडर विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्रात पदवी संपादन केली आहे. या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच वैयक्तिक पदक आहे.  तिने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते तसेच दोन वेळा तिने श्रीलंकेत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले हाँगकाँग मध्ये झालेल्या जागतिक चषक स्पर्धेत तिने सातवा क्रमांक मिळविला होता.

हेही वाचा : 38th National Sports 2025: कोल्हापूरच्या लेकीनं गाजवलं मैदान; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली ‘Gold Medal’ ची कमाई

माझी प्रतिस्पर्धी आकांक्षा ही व्यावसायिक खेळाडू असून ती परदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असते त्यामुळे तिच्याविरुद्ध मी माझ्या क्षमतेनुसार चांगली लढत दिली. अर्थात या स्पर्धेत माझे हे वैयक्तिक गटातील पहिलेच पदक असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. येथील रौप्य पदक मला पुढच्या करिअरसाठी प्रेरणादायक आहे असे अंजली हिने सांगितले.

Web Title: Rahul baitha and anjali semwal and sooraj chand won squash silver and bronze medal 38 national sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 09:22 PM

Topics:  

  • 38th India National Games

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.