फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Sanju Samson’s statement after the defeat against RCB : आयपीएल २०२५ चा २८ वा लीग सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीचा रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ४ गडी गमावून १७३ धावा केल्या. यशस्वी जयस्वालने शानदार ७५ धावा केल्या, तर ध्रुव जुरेलने नाबाद ३५ आणि रियान परागने ३० धावा केल्या. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
१७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबी संघाने शानदार फलंदाजी केली आणि १७.३ षटकांत फक्त १ गडी गमावून विजय मिळवला. फिल सॉल्टने ६५ धावा, विराट कोहलीने नाबाद ६२ धावा आणि देवदत्त पडिक्कलनेही नाबाद ४० धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सामना गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला, “हो, नक्कीच (१७० धावा करणे सोपे होते का असे विचारले असता). मला वाटते की इतक्या संथ खेळपट्टीवर नाणेफेक गमावणे महागात पडते. दुपारचा सामना खेळणे आणि पहिल्या १० षटकांसाठी उन्हात फलंदाजी करणे खूप कठीण आहे. आम्हाला माहित होते की आरसीबी आम्हाला कठीण लढत देईल आणि त्यांनी पॉवरप्लेमध्येच सामना त्यांच्या बाजूने वळवला.”
संजू पुढे म्हणाला, “झेलदार सामने जिंकतात. त्यांनी सामन्यांमध्ये अनेक कॅच आमचे आणि आम्ही त्यांचेही सोडले (हसत). आम्हाला आमचा खेळ सुधारावा लागेल यात शंका नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला याचे पूर्ण श्रेय द्यावे लागेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे सोपे होते आणि त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.” शेवटी संजू म्हणाला, “आम्ही आमच्या चुकांमधून शिकत आहोत आणि संघात जोरदार पुनरागमन करण्याबाबत चांगली चर्चा सुरू आहे. आम्हाला भूतकाळ विसरून पुढील सामन्यात सकारात्मक पुनरागमन करावे लागेल.”
𝘈𝘸𝘢𝘺 𝘫𝘶𝘨𝘨𝘦𝘳𝘯𝘢𝘶𝘵 𝘳𝘰𝘭𝘭𝘴 𝘰𝘯 💯
A blistering start from Phil Salt and an ice-cold finish from Virat Kohli power #RCB to win No. 4 👊
Scorecard ▶ https://t.co/rqkY49M8lt#TATAIPL | #RRvRCB | @RCBTweets pic.twitter.com/aO3wLyAnke
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
या सामन्यांमध्ये फिल्ल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी सामना एकतर्फी केला आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेमध्ये तिसरे स्थान गाठले आहे. या सीझनचा बंगळुरूच्या चौथा विजय आहे तर राजस्थान रॉयल्सचा हा स्पर्धेचा चौथा पराभव आहे. स्पर्धेच्या गुणतालिकेमध्ये सातव्या स्थानावर आहे. आतापर्यत राजस्थानच्या संघाने फक्त ६ सामान्यांमधील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.