Women's Day Special: Rajasthan Royals launch 'Pink Promise' jersey for IPL 2025; Will take to the field against 'this' team...
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगामाचा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. आज ८ मार्च महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून ‘पिंक प्रॉमिस’ जर्सी लाँच करण्यात आली आहे. 1 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सने ही विशेष जर्सी घालून मैदनात उतरणार आहे.
राजस्थान रॉयल्स फाउंडेशन (RRF) ने महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘औरत है तो भारत है’ नावाची एक मोहीम फिल्म लाँच केलीय आहे. राजस्थानमधील महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण परिवर्तनासाठी राजस्थान रॉयल्स संघ देखील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यासाठी खरेदी केलेल्या प्रत्येक तिकिटासाठी 100 रुपये योगदान देणार आहे.
हेही वाचा : Women’s Day Special : आशियात भारतीय महिलांचेच वर्चस्व; पाचव्या जेतेपदाला गवसणी घालत फडकवला तिरंगा..
या विशेष ‘ऑल-पिंक रॉयल्स जर्सी’च्या विक्रीतून मिळणारी रक्कम थेट राजस्थान रॉयल्स फाउंडेशनकडे त्यांच्या सामाजिक प्रभावाच्या उपक्रमांना समर्थन देण्यासाठी वापरण्यात येईल. कोणत्याही संघाच्या सामन्यातील प्रत्येक षटकारासाठी, राजस्थान रॉयल्स आणि राजस्थान रॉयल्स फाउंडेशन सांभर परिसरातील सहा घरांना सौरऊर्जेचे प्रकाश देण्यास वचनबद्ध असणार आहे.
राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा म्हणाला की, ‘पिंक प्रॉमिस’च्या माध्यमातून आम्ही केवळ व्यक्तींवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबावर आणि समुदायांवर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी आम्ही प्रत्यक्ष पाहिले की या उपक्रमाने अनेकांचे जीवन कसे बदलले आहे.
राजस्थान रॉयल्सचे सीईओ जेक लुश मॅक्रम म्हणाले की, आमचे फाउंडेशन सहा वर्षांपासून राजस्थानमधील लोकांच्या जीवनात बदल आंत आहे. ‘पिंक प्रॉमिस’ ने आमचे ध्येय जागतिक स्तरावर नेले आहे. लाखो लोकांना या प्रवासाचा भाग होण्यासाठी प्रेरित केले आहे. सौरऊर्जेद्वारे 260 घरे उजळण्यापासून ते सांभर ब्लॉकच्या पलीकडे जाऊन आमची पोहोच वाढवण्यापर्यंत, संपूर्ण भारतभर बदल घडवून आणणारी चळवळ निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. असे मॅक्रम यांनी सांगितले.
आयपीएल विजेतेपदासाठी 10 संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी आयपीएलचे सामने १३ मैदानांवर खेळवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आयपीएल 2025 मधील सामन्याची तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकता. आयपीएल पाहण्यात उत्सुक असणारे प्रेक्षक बुक माय शो और डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोला भेट देऊन तिकीट बुक करू शकतात. ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. या विशिष्ट सामन्याच्या तिकिटाची किंमत 900 ते 35,000 रुपयांपर्यंत असणार आहे.
आयपीएल सामन्याची तिकिटे ऑनलाइन सोबतच ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे. या सामन्याचे आयोजन करणाऱ्या विविध स्टेडियमवर तिकिटे उपलब्ध असणार आहेत. विशेष काउंटरवर तिकीट खरेदी करता येईल.