Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: पुण्यात क्रिकेटचा थरार! मेहक मुल्ला अन् आर्या चिखलीकर यांची तूफान खेळी; पहिल्याच दिवशी…

Cricket News: दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमीने २० षटकांत ४ गडी बाद १७७ धावांचा डोंगर उभा केला. आर्या चिखलीकर हिने अवघ्या ३० चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५२ धावांची वादळी खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2026 | 03:47 PM
Pune Cricket Competition

Pune Cricket Competition

Follow Us
Follow Us:
  • व्हेरॉक, स्कोअर स्पोर्ट्सची विजयी सलामी
  • ‘ऑक्सिरीच करंडक’ महिला आंतरक्लब टी-२० स्पर्धेचे आयोजन 
  • मेहक मुल्ला आणि आर्या चिखलीकर यांची धडाकेबाज कामगिरी 
Cricket News: पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘ऑक्सिरीच करंडक’ महिला आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी आणि स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमी या संघांनी आपल्या दमदार विजयांनी गाजवला. रावेत येथील (Pune) चॅम्पियन्स्‌ एरिना मैदानावर पार पडलेल्या या दोन्ही लढतींमध्ये अनुक्रमे मेहक मुल्ला आणि आर्या चिखलीकर यांच्या धडाकेबाज अर्धशतकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एसएसए ॲकॅडमीने २० षटकांत ९ गडी गमावून १४४ धावा केल्या. प्रणवी बनसोडे (३७ धावा), तनवी रटकंठीवर (२७ धावा) आणि जान्हवी पोळ (२० धावा) यांनी संघाचा डाव सावरला. व्हेरॉक वेंगसरकर ॲकॅडमीकडून श्रृती यादवने अचूक मारा करत २८ धावांत ४ गडी बाद केले, तर अवनी पाटीलने २ बळी घेतले.

Cricket News: पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅशमध्ये कॉग्निझंटचा विजयाचा चौकार! यूबीएस पुणेचीही विजयी घोडदौड कायम

१४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेरॉक वेंगसरकर ॲकॅडमीच्या सलामीच्या जोडीने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १४.१ षटकांत बिनबाद १४८ धावा फटकावत १० गडी राखून सहज विजय मिळवला. मेहक मुल्ला हिने ४६ चेंडूंत १७ चौकारांसह नाबाद ८३ धावांची, तर आराध्या पवार हिने ३९ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ५९ धावांची तुफानी खेळी केली.

स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमीची विजयी सलामी

दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमीने २० षटकांत ४ गडी बाद १७७ धावांचा डोंगर उभा केला. आर्या चिखलीकर हिने अवघ्या ३० चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५२ धावांची वादळी खेळी केली, तर समिक्क्षा पवार हिने ४५ चेंडूंत ७ चौकारांसह ५० धावा करत तिला उत्तम साथ दिली.१७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीचा संघ २० षटकांत ३ गडी बाद १२५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. लक्ष्य ॲकॅडमीकडून तनिष्का बागुल (५० चेंडूंत १४ चौकारांसह ७० धावा) आणि मेघना मोले (३५ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ३३ धावा) यांनी दिलेली झुंज अपुरी ठरली. स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमीने हा सामना ५२ धावांनी जिंकला.

मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन

तत्पूर्वी, माजी रणजीपटू सुभाष रांजणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, समिती सदस्य सुशील जाधव, प्रशांत तेलंगे, आनंद नायडू आणि मुकेश गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते.

Cricket News: खेळायचं तर रांगड्या पद्धतीनं! ‘या’ लीगमध्ये लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय

सामन्यांचा संक्षिप्त निकाल

पहिला सामना:एसएसए ॲकॅडमी: २० षटकांत ९ बाद १४४ धावा (प्रणवी बनसोडे ३७, तनवी रटकंठीवर २७, जान्हवी पोळ २०; श्रृती यादव ४-२८, अवनी पाटील २-१७) पराभूत वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी: १४.१ षटकांत बिनबाद १४८ धावा (मेहक मुल्ला नाबाद ८३ [४६ चेंडू, १७ चौकार], आराध्या पवार नाबाद ५९ [३९ चेंडू, ११ चौकार]).सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू: मेहक मुल्ला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘ऑक्सिरीच करंडक’ स्पर्धेच्या पहिल्या दिवहसी कोणते संघ आमनेसामने आले होते?

    Ans: ‘ऑक्सिरीच करंडक’ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी आणि स्कोअर स्पोर्ट्‌स ॲकॅडमी यांच्यात लढत झाली.

  • Que: कोणाच्या हस्ते या स्पर्धेच उद्घाटन करण्यात आले?

    Ans: माजी रणजीपटू सुभाष रांजणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Oxrich trophy womens interclub open cricket competition mehak mulla and arya chikhlikar pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

हा काय ऐकणार नाही! Vaibhav Suryavanshi ने नावावर केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; आता थेट बिहारच्या…
1

हा काय ऐकणार नाही! Vaibhav Suryavanshi ने नावावर केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; आता थेट बिहारच्या…

CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओडिशा AM/NS इंडियाचा डंका! ४ सुवर्णांसह ११ पदकांची कमाई
2

CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओडिशा AM/NS इंडियाचा डंका! ४ सुवर्णांसह ११ पदकांची कमाई

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

Suryakumar Yadav: ‘पहिले दोन महीने तर..’; टीम इंडियाबाहेर असल्याच्या दु:खावर सूर्यकुमारने सोडले मौन
4

Suryakumar Yadav: ‘पहिले दोन महीने तर..’; टीम इंडियाबाहेर असल्याच्या दु:खावर सूर्यकुमारने सोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.