Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI मध्ये मोठा संघटनात्मक बदल! नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळात मोठा संघटनात्मक बदल केला आहे. बीसीसीआयच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 29, 2025 | 03:03 PM
BCCI मध्ये मोठा संघटनात्मक बदल! नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती 
Follow Us
Close
Follow Us:

BCCI executive president : भारतीय क्रिकेट नियामक मंडळात मोठा संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. रॉजर बिन्नी यांच्या जागी आता राजीव शुक्ला ही जबाबदारी सांभाळणार आहेत.

बीसीसीआयच्या घटनेत असलेल्या तरतुदींनुसार हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआयने आखून दिलेल्या  नियमांनुसार, मंडळाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यासाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे इतकी आहे.

हेही वाचा : IPL मध्ये सर्वाधिक षटके टाकणारे गोलंदाज कोणते? नजर टाका टाॅप 5 गोलंदाजावर

नियुक्ती वैध..

रॉजर बिन्नी यांनी वयाची ७० वर्षे पार केली आहेत. ज्यामुळे त्यांना त्यांच्या पदमुक्त व्हावे लागले आहे. असे देखील सांगण्यात येत आहे की,  ही नियुक्ती सध्या वैध मानली जात आहे, कारण नवीन क्रीडा कायदा केंद्र सरकारकडून अद्याप अधिसूचित करण्यात आलेला नाही.  यामुळे, बीसीसीआयला त्यांच्या विद्यमान नियमांनुसार निर्णय घेण्याचा अधिकार अबाधित आहे.

ड्रीम-११ च्या जागी नवीन प्रायोजक शोधण्यावर चर्चा

या दरम्यान झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये  इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली आहे. बैठकीच्या अजेंड्यात ड्रीम-११ च्या जागी नवीन प्रायोजक शोधण्याबाबत देखील चर्चा यामध्ये सामील होती.  या बदलाचा भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय आणि आर्थिक पैलूंवर देखील खोलवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

 रॉजर बिन्नी यांनी पद का सोडले?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांनुसार, त्यांच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे इतकी ठरवण्यात आली आहे. या नियमानुसार, ७० वर्षे ४१ दिवसांचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना पद भूषविता  येणार नाही.

हेही वाचा : Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

राजीव शुक्ला यांचा कार्यकाळ  किती?

रॉजर बिन्नी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यामुळे राजीव शुक्ला यांची बीसीसीआयचे पुढील कार्यवाहक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. २०२० पासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष पदावर राहणारे ६५ वर्षीय राजीव शुक्ला पुढील अध्यक्षांच्या निवडीपर्यंत या पदावर राहणार  आहेत. सौरव गांगुलीनंतर १८ ऑक्टोबर २०२२ रोजी रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: Rajiv shukla appointed as new bcci executive president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • bcci
  • Roger Binny

संबंधित बातम्या

Virat Kohli-Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आणि रोहितची जोडी अखेरची दिसणार? BCCI ने केला मोठा खुलासा!
1

Virat Kohli-Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आणि रोहितची जोडी अखेरची दिसणार? BCCI ने केला मोठा खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.