Is Islamic culture being promoted among the players? This veteran said Rizwan's removal from the captaincy was because...
Rashid Latif’s statement about Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच चर्चेत असतो. आता या संघात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मोहम्मद रिझवानकडून एकदिवसीय कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आले आहे. त्याच्याजागी आता शाहीन शाह आफ्रिदी एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार असणार आहे. हा निर्णय आश्चर्यकारक मानला जात आहे. कारण गेल्या वर्षी बाबर आझमकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले होते, ज्यामुळे रिझवानच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती. आता, त्याच्याकडून देखील कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे सगळे अवाक झाले आहेत.
हेही वाचा : IND vs AUS : गिल आर्मी अॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान
रिझवानच्या हकालपट्टीमुळे पाकिस्तान क्रिकेट संघात एकच खळबळ उडल्याच्या दिसून आली आहे. माजी क्रिकेटपटू रशीद लतीफने या निर्णयावर निशाणा साधला आहे. त्याने असा विश्वास आहे की सध्याचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी गाझा-इस्रायल संघर्षात रिझवानने पॅलेस्टाईनला जाहीरपणे पाठिंबा दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये लतीफ असे म्हणताना ऐकू येतो की, “रिझवान हा एकदिवसीय कर्णधार नाही अशी बातमी आहे. केवळ त्याने पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला म्हणून, तुम्ही त्याला कर्णधारपदावरून काढून टाकाल का? ही मानसिकता अस्तित्वात आली आहे की एका इस्लामिक देशात एक गैर-इस्लामी कर्णधार सत्तेवर येणार.”
लतीफ पुढे म्हणाला की, “या निर्णयामागे माइक हेसनचा काही एक हात आहे ना? त्याला ड्रेसिंग रूममधील ही संस्कृती आवडत नसावी. लोकांना का समजत नाही? हा ५-६ जणांचा संघ असून तो ड्रेसिंग रूममधून ही संस्कृती संपवावी अशी इच्छा आहे. आम्हाला कोणताही आक्षेप नव्हता. इंझमाम-उल-हक तिथे उपस्थित होता… सईद अन्वर किंवा सकलेन मुश्ताक संघात होते. आमचा कधीही कोणताही आक्षेप नव्हता. इतर कोणत्याही खेळाडूला देखील नव्हता.”
मोहम्मद रिझवानपूर्वी बाबर आझम पाकिस्तान एकदिवसीय संघाचा कर्णधार होता, परंतु खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून पायउतार करण्यात आले. होते आता मोहम्मद रिझवानऐवजी संगहची धुरा शाहीन शाह आफ्रिदीकडे सोपवण्यात आली आहे. टी-२० संघाचेही नेतृत्व करणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.