ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
मालिकेतील दोन-चार दिवसांचे सामने बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना ३० ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे, तर दुसरा चार दिवसांचा सामना ६ नोव्हेंबर रोजीपासून खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा : कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…
तमिळनाडूचा साई सुदर्शनकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.साई या दोन्ही सामन्यांमध्ये उपकर्णधार म्हणून काम बघेल. महाराष्ट्राचा फलंदाज रुतुराज गायकवाडचा दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीप यांचा देखील संघात समावेश केला गेला आहे. स्टार फलंदाज केएल राहुलला देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी काही सराव करण्याची संधी मिळणार आहे, कारण त्याला दुसऱ्या सामन्यासाठी देखील संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
आशिया कप २०२५ आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत भारताने २-० असा विजय संपादन केला. ऋषभ पंत आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी राष्ट्रीय संघात समाविष्ट होणे निश्चित मानले जात आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामने १४ नोव्हेंबरपासून सुरू खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने होणार आहेत.
हेही वाचा : women’s odi world cup 2025 : पाकिस्तानची नाव किनाऱ्यावर लागेल का? आज बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी रंगणार सामना
ऋषभ पंत (कर्णधार) (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन (उपकर्णधार), रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुषन, जैशराज, जैशराज.
ऋषभ पंत (कर्णधार) (यष्टीरक्षक),ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, कृष्णा मोहम्मद, अभिमन्यू, अभिमन्यू, अभिमन्यू इ.






