रविंद्र जडेजाचं दुःख आलं बाहेर (फोटो सौजन्य - Instagram)
IND vs WI Playing XI: रविंद्र जडेजा Out, सिराज In, तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ करणार का बदल?
आगरकरच्या कार्यकाळात, जडेजाला २०२४ मध्ये श्रीलंका आणि २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले होते. जडेजा हा एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे आगरकर नेहमीच म्हणत असले तरी, त्यांच्या निर्णयांवरून ते जडेजाला संघाचा भाग मानत होते, असे कधीच दिसून आले नाही. याची खंत जडेजालाही नेहमी राहिली आहे आणि आता जडेजाच्या कमेंटवर या दोघांमध्येही कधीही आलबेल होतं असं वाटत नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, जेव्हा जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो स्पष्टपणे बोलला होता. जडेजा म्हणाला होता, ‘निवड माझ्या हातात नाही. मला निश्चितपणे खेळायचे आहे.सरतेशेवटी, संघ व्यवस्थापन, निवड समिती, प्रशिक्षक आणि कर्णधार यांचे स्वतःचे दृष्टिकोन आहेत आणि या मालिकेसाठी माझी निवड न करण्यामागे त्यांची स्वतःची कारणे असली पाहिजेत. त्यांनी माझ्याशी बोलले होते, त्यामुळे संघ जाहीर झाल्यावर मला आश्चर्य वाटले नाही.’
रवींद्र जडेजा त्याच्या सक्रिय सोशल मीडिया उपस्थितीसाठी ओळखला जात नाही. त्याने शेवटची प्रतिक्रिया या वर्षी फेब्रुवारीमध्ये रविचंद्रन अश्विनच्या नेपाळ क्रिकेटबद्दलच्या पोस्टला दिली होती. त्यामुळे, बीसीसीआयच्या मुख्य निवड समितीच्या पोस्टवर त्याचे अचानक दिसणे आणि अर्ज प्रक्रियेबद्दल विचारणा करणे, यावरून असे सूचित होते की आगरकर यांच्या कार्यकाळातील त्याचा अनुभव फारसा सुखकर नव्हता.
श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?






