
फोटो सौजन्य - Women's Premier League (WPL)
WPL 2026 Points Table : महिला प्रिमियर लीगची ही स्पर्धा रोमांचक वळणारवर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने सर्व सामने जिंकले आहेत, तर सुरूवातील मजबूत दिसणार गुजरात जायंट्सचा संघ हा मागील तीन सामन्यामध्ये पराभव झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB २०२६ च्या महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL च्या हंगामात वर्चस्व गाजवत आहे. कोणताही संघ RCB च्या जवळपासही नाही, कारण RCB ने ५ सामने जिंकले आहेत आणि १० गुण मिळवले आहेत.
कालच्या विजयानंतर आरसीबीच्या संघाने प्लेऑफमध्येही स्थान मिळवले आहे, तर इतर ४ संघांना या हंगामात आतापर्यंत फक्त ४ किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळवता आले आहेत. RCB सोमवार, १९ जानेवारी रोजी पाचवा सामना जिंकून WPL च्या चौथ्या हंगामाच्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. RCB आता इतर संघांचा खेळ खराब करू शकते, कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे लीग टप्प्यात अजूनही ३ सामने शिल्लक आहेत.
T20 World Cup 2026 आधी अफगाणिस्तानने टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजला पाजलं पाणी! 38 धावांनी केलं पराभूत
आरसीबी १० गुणांसह आणि चांगल्या नेट रन रेटसह पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु ५ सामन्यांनंतर त्यांचे फक्त ४ गुण आहेत. यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सचेही समान गुण आहेत, परंतु एमआयचा सध्या नेट रन रेट चांगला आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुण आहेत, परंतु एमआयचा नेट रन रेट सकारात्मक आहे, तर यूपी वॉरियर्स आणि गुजरातचा नेट रन रेट नकारात्मक आहे, जो भविष्यात चिंतेचा विषय ठरू शकतो.
Up here, everything feels earned. No place we’d rather be. 👑🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #WPL2026 pic.twitter.com/jaEd283hGM — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) January 20, 2026
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या चार सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि त्यांचे फक्त दोन गुण आहेत. पाच संघांच्या स्पर्धेत दिल्ली पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दिल्लीचा नेट रन रेट देखील लाल रंगात आहे, जो सुधारण्यावर जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखालील संघ लक्ष केंद्रित करेल. येथून, कोणताही संघ सामना गमावू इच्छित नाही, कारण सामना गमावल्याने कोणत्याही संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. सर्व संघांचे अजूनही किमान तीन सामने शिल्लक आहेत.
| संघ | सामना | विजय | पराभव | निकाल लागला नाही | गुण | रन रेट |
|---|---|---|---|---|---|---|
| आरसीबी | 5 | 5 | 0 | 0 | 10 | +1.882 |
| मुंबई इंडियन्स | 5 | 2 | 3 | 0 | 4 | +0.151 |
| यूपी वॉरियर्स | 5 | 2 | 3 | 0 | 4 | -0.483 |
| गुजरात जायंट्स | 5 | 2 | 3 | 0 | 4 | -0.863 |
| दिल्ली कॅपिटल्स | 4 | 1 | 3 | 0 | 2 | 0-856 |