RCB IPL winning rally: Disaster at RCB's winning rally: 7 people died in a stampede after the crowd lost control..
RCB IPL winning rally : आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण या आनंदाला गालबोट लागलें आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच, हा उत्साह चाहत्यांसाठी जिवावर बेतला आहे. आयपीएल विजेत्या टीमला बघण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबी संघाला बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी हा अपघात घडला आहे. या चेंगरांचेगरीत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १५ टे २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अशी माहिती समोर येत आहे की, लोक आरसीबी संघाची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर खूप तास झाले वाट पाहत बसले होते. संघ स्टेडियममध्ये पोहोचण्यापूर्वीच हा अनर्थ घडला आहे. घटनास्थळी गोंधळ उडाला आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
#Stampede at Bengaluru’s #ChinnaswamyStadium, where fans gathered to see Royal Challengers Bengaluru, 3 people feared dead and over 10 injured. The victims were rushed to Bowring Hospital.#RCB
— Aanya (@aanyagram) June 4, 2025
काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब संघाचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने तब्बल १८ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. विजयानंतर संघ बुधवारी दुपारी बेंगळुरूला पोहोचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विमानतळावर आला तेव्हा विमानतळाबाहेर उभ्या असणाऱ्या चाहत्यांनी आरसीबी संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. विमानतळाबाहेर चाहत्यांची संख्या इतकी होती की पोलिसांची देखील रस्ता मोकळा करताना दमछाक झाली. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघ विमानतळावर पोहचताच राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संघाचे स्वागत केले.
आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता ठरला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.