विजय मल्ल्या आणि विराट कोहली (फोटो-सोशल मिडिया)
RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावांचे आव्हान उभे केले होते. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला आणि परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीच्या विजयाचे सर्वच कौतुक करत आहेत. अशातच संघ चॅम्पियन झाल्यानंतर, आरसीबीचे माजी मालक असणारा विजय मल्ल्या याने देखील विराट कोहलीचे कौतुक केले असून म्हणाला की, इतकी वर्षे संघाशी एकनिष्ठ राहिला. हे पाहून खूप छान वाटत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकल्यानंतर, संघाचा माजी मालक विजय मल्ल्याने आठवणी ताज्या केल्या आहेत. त्याने १८ वर्षांपूर्वी लिलावात तरुण विराट कोहलीवर बोली कशी लावली होती याची आठवण करून दिली आहे. त्यासोबत तो म्हटला की, हा महान फलंदाज इतक्या वर्षे संघासोबत कसा एकनिष्ठ राहिला हे पाहून खूप आनंद झालाया आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी धुव्वा उडवत पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
हेही वाचा : RCB vs PBKS Final Match : बेंगळुरूमध्ये निघणार विजयी रथ: RCB ‘असा’ साजरा करेल पहिल्या ट्रॉफीचा आनंद..
आरसीबीच्या विजयानंतर मल्ल्याने ‘एक्स’ वर लिहिले की, “जेव्हा मी आरसीबी संघ स्थापन केला तेव्हा माझे स्वप्न होते की आयपीएलचे विजेतेपद बंगळुरूला मिळावे. मी युवा किंग कोहलीची निवड केली आणि तो १८ वर्षे आरसीबीसोबत राहिला हे पाहून खूप आनंद झाला.” विजय मल्ल्याने २००८ मध्ये आरसीबीला १११.६ दशलक्ष डॉलर्स (९,५९,९४,०५,४५३ रुपये) मध्ये विकत घेतले होते. जानेवारी २००८ मध्ये पहिल्या हंगामाच्या लिलावात त्याच्याकडून कोहलीची निवड करण्यात आली होती तेव्हापासून कोहली त्याच संघात कायम आहे.
When I founded RCB it was my dream that the IPL trophy should come to Bengaluru. I had the privilege of picking the legendary King Kohli as a youngster and it is remarkable that he has stayed with RCB for 18 years. I also had the honour of picking Chris Gayle the Universe Boss…
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 3, 2025
बँक कर्ज न भरू शकल्यामुळे २०१६ मध्ये मल्ल्याला संघाची मालकी गमवावी लागली. आता या टीमचा मालकी हक्क हा टीम युनायटेड स्पिरिट्सकडे आहे. कोहलीशिवाय, मल्ल्याने आरसीबीसाठी एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, जॅक कॅलिस आणि अनिल कुंबळे सारख्या दिग्गजांची देखील निवड केली होती.
मल्ल्याने पुढे लिहिलेया आहे की, “मी युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर ३६० एबी डिव्हिलियर्सची देखील निवड केली होती, जे आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. शेवटी आयपीएल ट्रॉफी बंगळुरूला येईल.” तो पुढे म्हणाला की, “माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद. आरसीबी चाहते श्रेष्ठ आहेत आणि या विजयास पात्र आहेत. ‘ई साला कप बेंगळुरू बरुथे.”