
RCB vs GG Live Score: RCB makes a big statement; sets a target of 183 runs for Gujarat Giants; Radha Yadav scores a powerful half-century.
RCB vs GG, WPL 2026 : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात जायट्स यांच्यात नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर लढत सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून आरसीबीने प्रथम फलंदाजी करत राधा यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून १८२ धावा उभ्या केल्या आहेत. स्मृती मानधनाच्या संघाला विजय मिळवण्यासाठी १८३ धावा कराव्या लागणार आहेत. गुजरातकडून सोफी डिव्हाईनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत.
नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या आरसीबी विरुद्ध गुजरात जायट्स सामन्यात, जरात जायट्स संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. आरसीबीची सुरवात आक्रमक झाली असली तरी दुसऱ्याच षटकात ग्रेस हॅरिसच्या रूपात पहिला धक्का बसला. हॅरिसला ५ धावांवर काशवी गौतमने बाद केले. त्यानंतर आरसीबीच्या विकेट्स जात राहिल्या. ४३ धावांवर संघाच्या ४ विकेट्स गेल्या होत्या. कर्णधार स्मृती मानधना ५ धावा, दयालन हेमलता ४ धावा तर गौतमी नाईक ९ धावा करून माघारी गेल्या.
त्यानंतर राधा यादव आणि ऋचा घोष यांनी १०५ धावांची भागीदारी रचली. राधा यादवने ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. यामध्ये तिने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तिला सोफी डिव्हाईनने बाद केले. तर २८ चेंडूत ४४ धावा(४ चौकार आणि २ षटकार) करणाऱ्या ऋचा घोषला जॉर्जिया वेरेहमने बाद केले. तर नादिन डी क्लार्कमे २६ धावांचे योगदान देऊन बाद झाली. अरुंधती रेड्डी नाबाद २ तर श्रेयांका पाटील ० धावेवर नाबाद राहिली. गुजरात जायट्सकडून सोफी डिव्हाईनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर काशवी गौतमने २ तर जॉर्जिया वेरेहम आणि रेणुका सिंग ठाकूरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : MIW vs UPW WPL 2026 : नॅट सायव्हर-ब्रंटचा WPL मध्ये धुराळा! ‘ही’ किमया साधत संयुक्तपणे आली अव्वलस्थानी
आरसीबीचा प्लेइंग ११ : ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), दयालन हेमलता, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल
जीजीची प्लेइंग ११ : बेथ मुनी (डब्ल्यू), सोफी डेव्हाईन, ॲशले गार्डनर (क), शिवानी सिंग, जॉर्जिया वेरेहम, कनिका आहुजा, भारती फुलमाली, काशवी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर