RCB Vs PBKS: Virat Kohli's 'that' action made Anushka Sharma's face red with shame, reaction goes viral; Watch video
RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने जोरदार कामगिरी केली आणि पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पंजाब संघ १०१ धावांवर गारद झाला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. प्रत्युउत्तरात आरसीबीने सलामीवीर फील सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरवार आरसीबीने ११ व्या षटकातच लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला आणि आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात विराट कोहलीचा उत्साह आणि अनुष्काचा हसरा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंजाब संघाकडून सुरुवातीपासूनच आक्रमक सुरवात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ही रणनीती त्यांच्यावर भारी पडली. आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक आणि वेगवान गोलंदाजी करत पंजाब संघाला १४.१ षटकात फक्त १०१ धावांत गुंडांळून टाकले.
हेही वाचा : MI vs GT : मुंबई इंडियन्सचा डाव होणार खल्लास, एलिमिनेटर सामन्यात गुजरातला गोल्डन संधी, वाचा सविस्तर…
सुयश शर्मा आणि जोश हेझलवूड या जोडीने आरसीबीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. दोन्ही गोलंदाजांनी ३-३ विकेट्स मिळवल्या. याशिवाय यश दयालने २ विकेट्स घेऊन विरोधी संघाला घुडगे टेकावायला भाग पाडले. पंजाबचे फलंदाज आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे हतबल आणि असहाय्य दिसून येत होते.
आरसीबीच्या या शानदार विजयाने चाहत्यांनाच आनंद दुणावला ही खरं असलं तरी स्टेडियममध्ये उपस्थित असलेली विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील या विजयाचा आनंद आवरता आला नाही. विराट कोहलीचा उत्साह प्रत्येक विकेटवर दिसून येत होता तसेच अनुष्काचा हसरा चेहरा देखील कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
anushka 😭💗😭💗😭💗😭 pic.twitter.com/sU6QkolV2E
— 𝙄.𝙆 𝙏𝙧𝙞𝙥𝙖𝙩𝙝𝙞 (@tripathi_gattu) May 29, 2025
या सामन्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अनुष्का तिच्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीला मिठी मारत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तेव्हा विराट कोहलीने स्टँडकडे पाहिले आणि अनुष्काकडे बोट उंचावले. तथापि, हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना असे वाटते की हा हावभाव “फक्त एक विजय शिल्लक आहे” असे म्हणण्याचा त्याचा मार्ग असल्याचे सांगत होता.
हेही वाचा : IND Vs END : भारतीय ‘अ’ संघाची आता खरी कसोटी, इंग्लंड लायन्स विरुद्ध करणार दोन हात..
आरसीबीची फलंदाजी देखील शानदार झालीय आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना, संघाने फक्त दोन विकेट गमावून सहज विजय आपल्या खिशात टाकला. या विजयासह, आरसीबी आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला संघ बनला आहे.