Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi Tournament : आरसीएफचा धडाका! व्यावसायिक गटात उपांत्य फेरीत धडक; नवशक्ती अकादमी उपांत्यपूर्व फेरीत

Kabaddi Tournament : 44 व्या मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी स्पर्धेत आरसीएफने व्यावसायिक गटात उपांत्य फेरी गाठली. महिला गटात नवशक्ती स्पोर्ट्स अकादमीने महात्मा फुले स्पोर्ट्सचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 22, 2026 | 09:15 PM
Kabaddi Tournament : आरसीएफचा धडाका! व्यावसायिक गटात उपांत्य फेरीत धडक; नवशक्ती अकादमी उपांत्यपूर्व फेरीत

Kabaddi Tournament : आरसीएफचा धडाका! व्यावसायिक गटात उपांत्य फेरीत धडक; नवशक्ती अकादमी उपांत्यपूर्व फेरीत

Follow Us
Follow Us:
  • आरसीएफ संघाची स्पर्धेत आगेकूच
  • महाराष्ट्र वाहतूक सेवेचा एकतर्फी पराभव
  • महिला गटात नवशक्ती स्पोर्ट्सची भरारी
 

Kabaddi Tournament : मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) संघाने व्यावसायिक गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिला गटात नवशक्ती स्पोर्ट्स अकादमीने उपांत्यपूर्व फेरी गाठत आगेकूच केली. विक्रोळी पश्चिम येथील कैलास कॉम्प्लेक्स रोडवरील महापालिका मैदानात ही स्पर्धा सुरू आहे.

महाराष्ट्र वाहतूक सेवेचा एकतर्फी पराभव

व्यावसायिक गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आरसीएफने महाराष्ट्र वाहतूक सेवेचा 26-07 असा एकतर्फी पराभव केला. प्रदीर्घ कालावधीनंतर स्पर्धेत खेळणाऱ्या आरसीएफच्या नवोदित खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पूर्वार्धात लोण देत 14-04 अशी आघाडी घेतल्यानंतर उत्तरार्धातही आणखी एक लोण देत विजय निश्चित केला.
दीप सिंग आणि यश पाटील यांनी चढाई व पकडीमध्ये प्रभावी कामगिरी केली. यापूर्वी आरसीएफने शुभश्री इंटरप्रायझेसचा 27-15 असा पराभव केला होता.

Kho Kho Championship : महाराष्ट्राच्या खो-खोपटूंचा मैदानावर धुमाकूळ; आंध्र, हिमाचलला लोळवले

महिला गटात नवशक्ती स्पोर्ट्सची भरारी

महिला गटात नवशक्ती स्पोर्ट्स अकादमीने महात्मा फुले स्पोर्ट्सचा 30-09 असा धुव्वा उडवला. दोन्ही डावांत प्रत्येकी एक लोण देत नवशक्तीने वर्चस्व राखले. वीणा थोरात आणि गायत्री देवळेकर यांच्या आक्रमक खेळामुळे संघाला विजय मिळाला. पराभूत संघाकडून अर्पिता साखळेने चांगला खेळ केला.

द्वितीय श्रेणी पुरुष गटात उत्कृष्ट मंडळाने पिछाडीवरून पुनरागमन करत अभिनव मंडळाचा 22-20 असा पराभव केला. विजय स्पोर्ट्स क्लबने धनराज स्पोर्ट्सला 24-14 असे नमवले. माऊली प्रतिष्ठानने जय बजरंग सेवावर 31-16 अशी मात केली, तर जय महाराष्ट्रने सक्षम मंडळाचा 27-11 असा पराभव केला.

या स्पर्धेमुळे मुंबई उपनगरातील कबड्डीपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत असून, पुढील फेरीतील सामन्यांकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड

💡

Frequently Asked Questions

  • Que: 44 वी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा कुठे सुरू आहे?

    Ans: विक्रोळी पश्चिम येथील कैलास कॉम्प्लेक्स रोडवरील महापालिका मैदानात ही स्पर्धा सुरू आहे.

  • Que: आरसीएफ संघाने कोणत्या गटात उपांत्य फेरी गाठली?

    Ans: आरसीएफने व्यावसायिक गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला.

  • Que: आरसीएफच्या विजयात कोणत्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली?

    Ans: दीप सिंग आणि यश पाटील यांनी चढाई व पकडीमध्ये प्रभावी खेळ केला.

Web Title: Rcf navshakti academy mumbai suburban district kabaddi tournament 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Kabbadi
  • Mumbai Suburban
  • Sports

संबंधित बातम्या

Elite Sports Management : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा मुंबईत गौरव; ‘हार्ट ऑफ गोल्ड’ सोहळ्यात खेळाडूंच्या संघर्षाला सल
1

Elite Sports Management : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा मुंबईत गौरव; ‘हार्ट ऑफ गोल्ड’ सोहळ्यात खेळाडूंच्या संघर्षाला सल

Kho Kho Championship : मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस; खो-खोच्या मैदानात खेळाडूंचा कस
2

Kho Kho Championship : मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस; खो-खोच्या मैदानात खेळाडूंचा कस

Kabaddi Tournament : मुंबईत २३ नोव्हेंबरपासून कबड्डीचा थरार! विजेत्या संघाला मिळणार ३५ हजारांचे पारितोषिक
3

Kabaddi Tournament : मुंबईत २३ नोव्हेंबरपासून कबड्डीचा थरार! विजेत्या संघाला मिळणार ३५ हजारांचे पारितोषिक

Kho Kho Championship : माटुंग्यात गुरुवारपासून खो-खोचा महासंग्राम! 24 संघ भिडणार, मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस
4

Kho Kho Championship : माटुंग्यात गुरुवारपासून खो-खोचा महासंग्राम! 24 संघ भिडणार, मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.