
Kabaddi Tournament : मुंबईत २३ नोव्हेंबरपासून कबड्डीचा थरार! विजेत्या संघाला मिळणार ३५ हजारांचे पारितोषिक
Kabaddi Tournament : यंग भारत सेवा मंडळाच्या हिरक महोत्सवी कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार लवकरच प्रभादेवीत रंगणार आहे. २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची गटवारी आणि पारितोषिके मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर येथील एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत.
प्रभादेवी येथील स्व. राजाभाऊ साळवी क्रीडागृहातील स्व. भिकाजी गुणाजी भारती क्रीडांगणावर ही स्पर्धा पार पडणार आहे. सहभागी होणारे सर्व संघ दर्जेदार असल्याने स्पर्धेतील सामने चुरशीचे आणि रंगतदार होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला स्व. भिकाजी गुणाजी भारती चषक आणि रोख ३५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला चषकासह २५ हजार रुपये मिळतील. तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी १० हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
वैयक्तिक कामगिरीसाठीही आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला माजी स्वातंत्र्यसैनिक स्व. मोहन कदम यांच्या स्मरणार्थ सात हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. उत्कृष्ट चढाईपटूला स्व. श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ चार हजार रुपये, तर उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूला स्व. अर्जुन राऊत यांच्या स्मरणार्थ चार हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक दिवसाचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूला एक हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
स्पर्धेतील सामने नियोजित वेळेत सुरू करण्याचा आयोजकांचा मानस असून, सर्व सहभागी संघांनी वेळेचे पालन करावे, असे आवाहन यंग भारत सेवा मंडळाने केले आहे.
Ans: ही स्पर्धा 23 ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
Ans: मुंबईतील प्रभादेवी येथील स्व. राजाभाऊ साळवी क्रीडागृहातील स्व. भिकाजी गुणाजी भारती क्रीडांगणावर स्पर्धा होणार आहे.
Ans: या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.