Asia Cup 2025: IND vs PAK match writes new history! Records rain on Dubai ground; Read once
IND vs PAK : काल रविवारी, २१ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ (Asia cup 2025) मधील सुपर ४ सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारताविरुद्ध एकूण १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने हे लक्ष्य सहज पूर्ण केले आणि पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना जेरीस आणले. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दोन वेळा धूळ चारली आहे. या सामन्यात अनेक विक्रम रचले आणि मोडले गीळ आहेत. याबाबत आपण जाणून घेऊया.
भारताचे युवा सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या जोडीने पाकिस्तानविरुद्ध १०५ धावांची मोठी भागीदारी रचली. आशिया कप २०२५ मध्ये कोणत्याही जोडीने केलेली ही पहिली शतकी भागीदारी ठरली आहे.
भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध ५ षटकार लगावले. यासह त्याने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५० षटकार देखील पूर्ण केले. त्याने फक्त ३३१ चेंडूत ही कामगिरी करून दाखवली आहे. ज्यामुळे एविन लुईसचा विक्रम मोडीत काढला आणि ५० षटकार मारणारा सर्वात जलद फलंदाज बनला आहे.
भारतीय संघाने सलग सातव्यांदा पाकिस्तानवर विजय मिळवला आहे(एकदिवसीय आणि टी-२० सह). चार वर्षांपूर्वी पाकिस्तानने शेवटचा आशिया कप सुपर ४ सामन्यात भारताचा पराभव केला होता.
पाकिस्तान संघाने प्रथमच भारताविरुद्ध फलंदाजी करताना १७१ धावा केल्या, ही या परिस्थितीत त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाने नऊ वेळा विजय साकार केला आहे. फक्त एकदाच, टी-२० विश्वचषकात, भारताने ६ धावांनी विजय मिळवला आहे.
हार्दिक पंड्याची शानदार कामगिरी
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने या सामन्यात देखील एक बळी घेतला. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात बळी मिळवले आहेत. यावेळी, शेजाऱ्यांविरुद्ध त्याचा बळींचा आकडा १५ बळींवर जाऊन पोहोचला आहे.
भारताच्या अभिषेक-गिल या सलामीवीर जोडीने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध १०० पेक्षा जास्त धावा केल्या. यापूर्वी, २०१२ मध्ये गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे यांची ७७ धावांची भागीदारी ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी राहिली होती.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘शाहीन आफ्रिदीचा फॉर्म खराब, त्याने आता ब्रेक घ्यावा..’, पाकिस्तानी माजी खेळाडूचा सल्ला
अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध फक्त २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो आता पाकिस्तानविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने युवराज सिंगला देखील मागे टाकले आहे, ज्याने २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.