Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T-20 World Cup 2026 : ‘त्यांचे निर्णय घेऊ शकलो असतो, पण…’,सूर्याला पाकशी सामना होण्याची अपेक्षा; भारतीय संघ कोलंबोला जाणार 

७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना अनिश्चित मानला जात आहे. यावर आता भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपले मौन सोडले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 05, 2026 | 06:31 PM
T20 World Cup 2026: 'We could have made those decisions, but...', Surya expects a match against Pakistan; the Indian team will go to Colombo.

T20 World Cup 2026: 'We could have made those decisions, but...', Surya expects a match against Pakistan; the Indian team will go to Colombo.

Follow Us
Close
Follow Us:

Suryakumar Yadav comments on the India-Pakistan match : टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणसंग्रामाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे सह-यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना नियोजित  आहे. परंतु, पाकिस्तानकडून आधीच या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने याबाबत आपले मौन सोडले आहे.

हेही वाचा : DC vs RCB, WPL 2026 Final : मैत्रिणीच येणार आमनेसामने! जेमिमा आणि स्मृती यांच्यात जेतेपदासाठी लढत; जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने गुरुवारी स्पष्ट केले की, पाकिस्तानने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचा संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या नियोजित सामन्यासाठी कोलंबोला जाणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी भारताचा दीर्घकाळचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानसोबत सामना होणार आहे, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला सामन्यात सहभागी न होण्याचे निर्देश दिले आहेत. बांगलादेशकडून भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला स्पर्धेतस्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल सूर्याचे मत काय?

टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेपूर्वी कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवने आपले मत मांडले. तो म्हणाले की, “मला वाटते की त्यांचा निर्णय माझ्या नियंत्रणात नाही. मी त्यांचे निर्णय घेऊ शकलो असतो, पण तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही आशिया कपमध्ये तीन वेळा त्यांच्याविरुद्ध खेळलो आहोत आणि आम्हाला अनुभव आहे.” सूर्या पुढे असा देखील म्हणाला की, “आमची विचारसरणी स्पष्ट आहे. आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिलेला नाही. त्यांच्याकडून नकार देण्यात आला आहे. आयसीसीने वेळापत्रक अंतिम केले आहे, आमचे विमान तिकिटे बुक झाली आहेत आणि आम्ही कोलंबोला जात आहोत.”

भारतीय संघाच्या योजना शेअर करताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “संघाने चर्चा केली आहे की आम्ही ७ फेब्रुवारी रोजी सामना खेळू आणि नंतर कोलंबोला जाऊ. आम्ही त्यांच्याविरुद्ध चांगले क्रिकेट खेळलेलो आहोत. सामना तटस्थ ठिकाणी आहे आणि जर संधी मिळाली तर आम्ही खेळू. पाकिस्तानी खेळाडूंसाठी देखील हा एक कठीण निर्णय आहे.”

हेही वाचा : T-20 World Cup 2026 : विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी! ब्लु आर्मीच्या विजयासाठी गणरायाला केली प्रार्थना

भारतीय संघाची मोहीम ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार

भारताचे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील वेळापत्रक टी-२० विश्वचषक २०२६ चे भारत आणि श्रीलंका सह-यजमानपद भूषवणार आहेत. भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध सामना होणार आहे. वेळापत्रकानुसार, १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे, परंतु हा सामना सध्या अनिश्चित अशा परिस्थितिमध्ये आहे. पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या संघाला भारताविरुद्ध हा सामना खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळेल. भारत भारताबाहेर फक्त एकच सामना खेळणार आहे.

Web Title: T20 world cup 2026 suryakumar yadav expects a match against pakistan breaks his silence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी
1

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
2

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.