Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या बहिष्कारावर प्रश्नचिन्ह! कोच गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेमुळे उडाली खळबळ; नेमकं काय घडलं? 

पाकिस्तान संघाकडून टी२० विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आले. याबाबत भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला विचारणा करण्यात आली तर त्याने उत्तर देणे टाळले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 04, 2026 | 12:03 PM
T20 World Cup 2026: Doubts raised over Pakistan's boycott! Coach Gautam Gambhir's reaction creates a stir; what exactly happened?

T20 World Cup 2026: Doubts raised over Pakistan's boycott! Coach Gautam Gambhir's reaction creates a stir; what exactly happened?

Follow Us
Follow Us:

Gautam Gambhir’s reaction to the India vs Pakistan match : भारत आणि श्रीलंका संयुक्त आयोजित करत असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेला ७ फेब्रुवारी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज झाले आहे. अलीकडेच पाकिस्तान संघाने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.याबाबत बरेच वाद निर्माण होताना दिसून येत आहेत. दरम्यान, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारताविरुद्धच्या हाय-व्होल्टेज T20 विश्वचषक सामन्यातून माघार घेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर बोलण्यास नकार दिला.

गौतम गंभीरने उत्तर देणे टाळले

मुंबईला जाण्यापूर्वी, विमानतळावरील पत्रकारांनी गौतम गंभीरला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रश्नांकडे पूर्णपणे केल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार देखील मानले आणि काहीही न बोलता पुढे निघून गेले.

हेही वाचा : IND vs SA, T20 World Cup 2026 : संजू की इशान? भारतीय संघासमोर सलामीसाठी पेच! सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

गट अ मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट अ मध्ये आहेत. या गटात  अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया यांचा देखील समावेश आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पाकिस्तान त्याच दिवशी कोलंबोमध्ये नेदरलँड्सविरुद्ध आपला पहिला सामना खेळून मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर भारतनंतर अमेरिकेशी दोन हात करणार आहे.

भारतीय संघाचा दमदार फॉर्म

विश्वचषकापूर्वी भारतीय संघ चांगल्याच फॉर्ममध्ये दिसून येत आहे. भारताने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत  ४-१ अशी बाजी मारली. तसेच पाकिस्तान संघाने आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केले आणि  या स्पर्धेत प्रवेश केला आहे. तथापि, आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्ड खूपच खराब असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही संघ आतापर्यंत आठ वेळा एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले. ज्यामध्ये भारताने सात सामने आपल्या खिशात टाकले आहेत.  तर पाकिस्तान संघाला फक्त एकच विजय मिळवण्यात यश आले.

आशिया कपच्या आठवणी पुन्हा झाल्या ताज्या

मागील वर्षीच्या आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर चांगलाच दबदबा राखला. अंतिम सामन्यासह संपूर्ण मालिकेत भारताने पाकिस्तानवर एकतर्फी  विजय मिळवला. या सामन्यांमध्ये भारताचे युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी आपली छाप पडली होती. विशेषतः, तिलक वर्माने १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अंतिम सामन्यात नाबाद ६९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : विदेशी संघात भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंचा बोलबाला! टी-२० विश्वचषकात तीन डझनहून अधिक खेळाडू खेळताना दिसणार

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी दोन्ही संघ खालील प्रमाणे

भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

पाकिस्तान संघ: सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.

Web Title: T20 world cup 2026 gautam gambhirs reaction to the india vs pakistan match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND VS PAK
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा
1

Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.