फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान : महिला T२० विश्वचषकाला ३ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. भारतीय महिला संघाचे आतापर्यत २ सामने झाले आहेत. भारताच्या संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्व दमदार कमबॅक केला आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये काल म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पार पडला. यामध्ये भारतीय महिला संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. आता टीम इंडियाचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे, हा सामना ९ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. परंतु त्याआधी भारत पाक सामन्यातील भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाका.
भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर गोलंदाजीमध्ये अनुराधा रेड्डीने कमालीची कामगिरी करू ३ विकेट घेतले. तर फलंदाजीमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजी करत सामना जिंकला. भारताच्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीच्या व्यतिरिक्त त्याच्या फिल्डिंगमध्ये सुद्धा मोठा सुधार केला आहे. आता भारतीय क्रिकेट किंवा बीसीसीआय सामना झाल्यानंतर संघाचे फिल्डिंग कोच सामन्यामध्ये चांगली फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना एक बेस्ट फिल्डिंगच मेडल दिल जात. आता बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये बेस्ट फिल्डिंगचे मेडल कोणाला मिळालं यावर नजर टाका.
बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये बेस्ट फिल्डरचे नाव घोषित केले आहे. बेस्ट फिल्डरच्या शर्यतीमध्ये रिचा घोष, श्रेयांका पाटील आणि जेमिमाह रॉड्रिक्स या नावांचा समावेश होता. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच मुनीश बाली म्हणतात की चला सगळे बसमध्ये तेव्हा संपूर्ण संघ बसमध्ये आणि त्यावेळी बेस्ट फिल्डिंगचे मेडल रिचा घोषला देण्यात येते.