फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश – रिंकू सिंह : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये T२० मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भारताच्या घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान दिले आहे. यामध्ये भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंहला सुद्धा संघामध्ये स्थान मिळाले आहे. नुकताच रिंकू सिंहचा एक व्हिडीओ सध्या बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याने एक नवा टॅटू काढला आहे, या टॅटूच्या संदर्भात त्यांनी खुलासा केला आहे. त्याने हातावर बनवलेल्या टॅटूची कहाणी सांगितली आहे. सध्या त्याचा हा टॅटूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
रिंकूने सांगितले की, लोक त्याला देवाच्या प्लॅनच्या नावानेही ओळखतात. या टॅटूचा याच्याशी संबंध आहे. रिंकूने सांगितले की, टॅटूची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने मारलेले पाच षटकार त्यावर चित्रित करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रिंकूचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो सध्या टीम इंडियासोबत ग्वाल्हेरमध्ये आहे.
बीसीसीआयने रिंकूचा व्हिडिओ X वर शेअर केला आहे. रिंकू सिंह म्हणाला की, ‘सगळ्यांना माहीत आहे की मी गॉड्स प्लॅन असं बोलतो. मी त्याचा बनवलेला टॅटू खूप प्रसिद्ध होत आहे. फक्त काही आठवडे झाले आहेत. टॅटूमध्ये, सूर्य देवाच्या योजनेभोवती काढला आहे. यासह, मी मारलेल्या पाच षटकारांपैकी दोन कव्हर्समध्ये, दोन समोर आणि आणखी एक होते. यामुळे माझे आयुष्य बदलले, लोक मला ओळखू लागले. म्हणूनच मी हा टॅटू काढला आहे.
When you hear 𝗚𝗼𝗱’𝘀 𝗣𝗹𝗮𝗻 in cricket, you know it’s about Rinku Singh 😎
He’s got a new tattoo about it and there’s more to that special story! 🎨
#TeamIndia | #INDvBAN | @rinkusingh235 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GQYbkJzBpN
— BCCI (@BCCI) October 5, 2024
रिंकला आतापर्यंत भारताकडून कमी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. पण आतापर्यंत त्यांनी अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. रिंकू नवीन फिनिशर म्हणून सावरत आहे. टीम इंडियापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे.