Underworld threat on cricket! Rinku Singh threatened by D-Company; 2 arrested
Rinku Singh threatened with a ransom of Rs 5 crore: भारतीय क्रिकेटवर आता अंडरवर्ल्डचे सावट दिसून येत आहे. भारतीय संघाचा उदयोन्मुख स्टार रिंकू सिंगला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून (डी-कंपनी) धमक्या देण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने हे प्रकरण उघड केले असून ज्यामुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेच्या सांगण्यानुसार, या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अंडरवर्ल्डकडून रिंकू सिंगच्या प्रमोशनल टीमला तीन धमकीचे संदेश पाठवण्यात आले होते. या धमक्यांमधून क्रिकेटपटू रिंकू सिंगकडून ५ कोटी रुपयांची मोठी खंडणी मागण्यात आली होती. क्रिकेट जगतात स्वतःची वेगळी छाप पडणाऱ्या रिंकू सिंग या तरुण खेळाडूला मिळालेल्या या धमकीची गंभीर दखल घेतली गेली आहे.
हेही वाचा : इंग्लडचा कर्णधार Harry Brook चं पण ठरलं! चार वर्षापासून डेट करत असलेल्या गर्लफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा
तथापि, विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार खंडणीची रक्कम ५ कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले जात आहे, तर काहींनी ही रक्कम १० कोटी रुपये इतकी सांगितली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी सक्रिय होत, तात्काळ कारवाई करत या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. दोघेही दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधितअसल्याचे आणि या खंडणी कटात सहभागी असल्याचे बोलले जात आहे.
अंडरवर्ल्डकडून भारतीय सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू लागला आहे. या कटामागील संपूर्ण नेटवर्क आणि सूत्रधार कोण आहेत ही उघड करण्यासाठी पोलिस आता अटक केलेल्या व्यक्तींची चौकशी करू लागले आहेत. रिंकू सिंग आणि त्याच्या टीमच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत.
रिंकू सिंग सपा खासदाराशी होणार विवाहबद्ध
रिंकू सिंगने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) साठी शानदार कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. आशिया कप २०२५ च्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध चौकार मारून तो भारताच्या विजयाचा नायक ठरला होता. रिंकू सिंगचे लग्न जौनपूरमधील मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रिया सरोजशी होणार आहे. या दोघांचा साखरपुडा पार पडला आहे. प्रिया समाजवादी पक्षाची खासदार बनली आणि तिचे वडीलही अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत.