Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऋषभ पंत सुसाट! ICC Test Rankings मध्ये घेतली मोठी झेप; जो रूट पहिल्या स्थानावर कायम.. 

आयसीसीने बुधवारी नवीन रँकिंग जाहीर केली आहे. या ताज्या फलंदाजी क्रमवारीत भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठे झेप घेऊन ६ व्या स्थानावर पोहचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 02, 2025 | 05:22 PM
Rishabh Pant is doing well! He took a big leap in the ICC Test Rankings; Joe Root remains at the top spot..

Rishabh Pant is doing well! He took a big leap in the ICC Test Rankings; Joe Root remains at the top spot..

Follow Us
Close
Follow Us:

ICC Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सांमन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जात आहे.  इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या  कसोटी सामन्यापूर्वी आयसीसीकडून खेळाडूंची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीने बुधवारी नवीन रँकिंग जाहीर केली आहे. या ताज्या फलंदाजी क्रमवारीत भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठे झेप घेतली आहे. पंत एका स्थानाने वर सरकला आहे.

ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही डावात शतके ठोकल्यानंतर त्याच्या रँकिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावात ११८ धावांची खेळी केली होती. या दोन शतकांसह, पंतने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग पॉइंट गाठले आहेत. तो सध्या ८०१ गुणांसह सहाव्या स्थानावर पोहचला आहे. तो अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या जो रूटपेक्षा केवळ ८८ गुणांनी पिछाडीवर आहे. पंतने याआधी  जुलै २०२२ मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवे रँकिंग गाठले होते.

हेही वाचा : Captain cool trademark : ‘कॅप्टन कूल’ नोंदणीमागे MSD चा मोठा प्लॅन; धोनीला मिळणार ‘हे’ खास फायदे

जो रूट पहिल्या स्थानावर कायम

भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर कायम आहे.  फलंदाजांच्या यादीमध्ये तो अव्वल भारतीय खेळाडू आहे. कर्णधार शुभमन गिल एका स्थानाने घसरून २१ व्या स्थानावर पोहचला आहे. भारताविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत २८ आणि नाबाद ५३ धावा काढणारा रूट दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडचा हॅरी ब्रूकपेक्षा १५ गुणांनी पुढे आहे.तर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १४९ धावा काढून इंग्लंडला विजय मिळवून देणारा सलामीवीर बेन डकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर विराजमान आहे.

Career-high marks for a couple of centurions in the #ENGvIND Test series.https://t.co/8VqTWrxpSC — ICC (@ICC) July 2, 2025

हेही वाचा : IND Vs ENG : एजबेस्टनसाठी टीम इंडियात मोठे बदल; ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या अष्टपैलूसह ‘या’ तीन खेळाडूंची लॉटरी, ठाकूरला डच्चू

जसप्रीत बुमराहचा पहिलं नंबर कायम

भारताच्या वेगवान गोलंदाजीच्याआक्रमणाचा कणा असणारा जसप्रीत बुमराह ९०७ रेटिंग गुणांसह गोलंदाजी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने पाच बळी टिपले होते. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या स्थानावर आहे. जोश हेझलवूड एका स्थानाने पुढे सरकला असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमान अलीला मागे टाकले आहे. दरम्यान, भारताचा रवींद्र जडेजा देखील कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीममध्ये अव्वल स्थानावर कायम आहे.

Web Title: Rishabh pant makes a big jump in icc test rankings joe root remains at number one

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • ICC Ranking
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…
1

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…

IND vs SA : कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’, वीरेंद्र सेहवागला मागे टाकत रचला इतिहास
2

IND vs SA : कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’, वीरेंद्र सेहवागला मागे टाकत रचला इतिहास

IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार? 
3

IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार? 

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे
4

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.