
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये सध्या भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये १५० धावा केल्या आणि टीम इंडियाचा संघ बाद झाला. त्यानंतर भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा हालत अशीच काहीशी केलेली दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे देखील आतापर्यत ९ विकेट्स गेले आहेत. यामध्ये त्यांनी ४९ ओव्हरमध्ये १०२ धावा केल्या आहेत.
सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हेजलवूड आणि स्टार्क हे दोघे संघासाठी फलंदाजी करत आहेत. ५० ओव्हरनंतर भारताच्या संघाकडे अजूनही ४८ धावांची आघाडी आहे. कालच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा विकेटकिपर रिषभ पंतने संघासाठी महत्वाची भूमिका बजावली. तो जेव्हा भारताचा संघ संकटात असतो तेव्हा नेहमीच तो टीम इंडियाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याचा असतो. केएल राहुल आणि नितीश रेड्डीसह यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी भारताला १५० धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पंतने नितीश रेड्डीसोबत सातव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान पंतने ७८ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि १ गगनचुंबी षटकाराच्या मदतीने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर पंतने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या इतिहासात यष्टीरक्षक म्हणून २००० धावांचा आकडा पार करणारा तो जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. होय, पंतच्या नावावर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३० सामन्यांच्या ५२ डावांमध्ये २०३४ धावा आहेत. या कालावधीत पंतची सरासरी ४२.३७ आणि सर्वोच्च धावसंख्या १४६ आहे.