फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रिषभ पंतची सोशल मीडिया पोस्ट : भारताचा रिषभ पंत त्याच्या कामगिरीमुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. त्याचा झालेला कार अपघात प्रकरण देशाने पाहिलं. त्यानंतर आता त्याने काही महिन्यापूर्वी झालेल्या T२० विश्वचषकामध्ये पुनरागमन केले आहे. रिषभ त्याच्या सोशल मीडियावर बऱ्याच वेळा सक्रिय पाहायला मिळतो. आता नुकतीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे आणि त्यांना सलाम केला आहे. भारताने या ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह एकूण सहा पदके जिंकली. एकूण सहा पदक भारताने नावावर केली आहेत.
रिषभ पंतने सोशल मीडियावर एक फोटोंचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचे फोटो आहेत आणि त्याला ‘मा तुझे सलाम’ हे गाणे लावले आहे.
त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक खेळाडू म्हणून मी समजू शकतो की आमच्या खेळाडूंनी देशाला गौरव मिळवून देण्यासाठी किती मेहनत आणि त्याग केला असेल. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा आम्हाला अभिमान वाटला आहे.” मला खात्री आहे की त्यांनी या खेळातून बरेच काही शिकले आहे. सर्व विजेत्यांना माझ्या शुभेच्छा.
मनू भाकरने भारतीय नेमबाजी इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली आणि त्याच ऑलिम्पिक गेम्सच्या आवृत्तीत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर महाराष्ट्रामधील स्टार नेमबाज स्वप्नील कुसळेनेही इतिहास रचला. ५० मीटर एअर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला. अमन सेहरावतने कुस्तीच्या इतिहासात नवा विक्रम केला आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. वयाच्या अवघ्या २१ वर्षे २४ दिवसांनी ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक पटकावले.