IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) दुसरा सामना अॅडलेड ओव्हलवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही, मात्र ऑस्ट्रेलियाने तीन बदल केले (जोश फिलिप, नॅथन एलिस आणि मॅथ्यू कुहनेमन यांच्या जागी अॅलेक्स केरी, झेवियर बार्टलेट आणि अॅडम झम्पा संघात).
नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. सुरुवातीला सावध खेळ करणाऱ्या रोहितने तिसऱ्या षटकात शानदार चौकार मारला आणि याच फटक्याने त्याने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
🚨 HISTORY BY ROHIT SHARMA 🚨 Rohit Sharma becomes the first Indian to score 1000 runs in Australia against Australia in ODI History. 🔥 1,000* – Rohit Sharma (21 Inns)
802 – Virat Kohli (19 Inns)
740 – Sachin Tendulkar (25 Inns)
684 – MS Dhoni (20 Inns)
517 – Shikhar Dhawan… pic.twitter.com/tTM1yWjpqK — All Cricket Records (@Cric_records45) October 23, 2025
फलंदाज | धावा |
रोहित शर्मा | १००६ |
विराट कोहली | ८०२ |
सचिन तेंडुलकर | ७४० |
एमएस धोनी | ६८४ |
शिखर धवन | ५१७ |
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार विव रिचर्ड्स यांच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. रिचर्ड्स यांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० सामन्यांमध्ये १९०५ धावा केल्या. जर रोहित शर्मा त्याच्याइतकेच सामने खेळला तर तो हा विक्रम मोडू शकेल. तथापि, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला ३८ वर्षीय खेळाडू किती काळ खेळू शकतो हे पाहणे बाकी आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. त्यांनी सातव्या षटकात शुभमन गिल (९) आणि विराट कोहली (०) यांना १७ धावांवर गमावले. रोहित शर्माला दुसऱ्या टोकावर श्रेयस अय्यरने साथ दिली. बातमी लिहपर्यंत भारताने २७ षटकांत दोन गडी गमावून ११७ धावा केल्या आहेत. रोहित ६३ आणि श्रेयस ४३ धावांवर खेळत आहे.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेझलवुड.