फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घाम गाळला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजांनी संघाची दमदार सुरुवात करून दिली. भारताच्या संघांच्या हाती बराच वेळ दुसऱ्या सेशनपर्यत फक्त एकच विकेट हाती लागला होता. त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या सेशनमध्ये भारताच्या गोलंदाजानी कमबॅक केला आहे आणि टीम इंडियाने ५ विकेट्स घेतले आहेत. आता या गरामगरमीच्या वातावरणामध्ये रोहित शर्मा यशस्वी जयस्वालवर भडकलेला दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडत नसताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा नवीन रणनीती बनवत होता. मात्र, तोही थोडासा चिडलेला दिसत होता, कारण जयस्वालने त्याचे ऐकले नाही, तेव्हा त्याने मैदानाच्या मध्यभागी यशस्वीला शिवीगाळही केली. कॅप्टन रोहित शर्माने यशस्वीला विचारले, तू स्ट्रीट क्रिकेट खेळतोस का? नंतर यशस्वीने त्यांच्या म्हणण्याला सहमती दिली. रोहित शर्माने आपल्या मुंबई शैलीत मुंबईतील रहिवासी यशस्वी जैस्वालला चेंडू बघायला शिकवले.
खरं तर, जेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन फलंदाजी करत होते, तेव्हा रोहित शर्माने यशस्वी जैस्वालला जवळचा क्षेत्ररक्षक म्हणून फलंदाजासमोर फिरकीपटूंसमोर ठेवले होते. मात्र, फलंदाज चेंडू खेळू शकण्यापूर्वीच जयस्वालने एक-दोनदा हवेत उडी मारली. अशा स्थितीत त्याची नजर ना फलंदाजाकडे होती ना चेंडूकडे… त्यामुळे तो झेलही पकडू शकला नाही. यामुळेच रोहितने यशस्वीला सांगितले की अरे जस्सू (जैस्वाल), तु रस्त्यावर क्रिकेट खेळत आहेस का? यानंतर रोहित म्हणाला जोपर्यंत फलंदाज चेंडू खेळत नाही तोपर्यंत उठू नकोस.
Rohit Sharma to Yashasvi Jaiswal:
“Arre Jassu, gully cricket khel raha hain kya tu? Jab tak ball khele nai, uthne ka nai (Jassu, are you playing gully cricket? Don’t jump until he plays the ball)”. 🤣👌 pic.twitter.com/6ErdiT6bEr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2024
रोहितची इच्छा होती की जोपर्यंत फलंदाज चेंडू खेळत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या जागेवरून उठायचे नाही… कधी जवळच्या क्षेत्ररक्षकाला गुडघ्यावर हात ठेवून उभे राहावे लागते, तर कधी जवळच्या क्षेत्ररक्षकाला बसून क्षेत्ररक्षण करावे लागते. त्याच स्थितीत क्षेत्ररक्षक झेल घेऊ शकतो. तसेच या सामन्यात भारताला विकेट मिळत नव्हत्या आणि क्षेत्ररक्षणात असा निष्काळजीपणा केल्यास माफ होणार नाही. भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या दोन सत्रात केवळ दोन विकेट मिळाल्या. अशा स्थितीत क्षेत्ररक्षण तंग ठेवण्याचे दडपण कर्णधारावर होते.