फोटो सौजन्य: @rushiii_12/X.com
भारतात Tesla Model Y लाँच झाली आणि ऑटो बाजारात या इलेक्ट्रिक एसयूव्हीची क्रेझ निर्माण झाली. खरंतर, Tesla भारतात येणार अशी बातमी सगळीकडेच पसरली असतानाच 15 जुलै 2025 रोजी एलोन मस्कच्या टेस्लाचा पहिला वाहिला शोरूम मुंबईतील BKC येथे सुरु झाला.
टेस्लाची कार लाँच झाल्यानंतर अनेक सेलिब्रेटींच्या कार कलेक्शनमध्ये या कारचा समावेश झाला. आता यात Rohit Sharma ची सुद्धा भर पडली आहे. नुकताच हिटमॅन त्याच्या नवीन टेस्ला मॉडेल वाय मध्ये दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला, रोहितच्या नवीन कारचे फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
Hardik Pandya कडून Lamborghini Car खरेदी; किंमत अशी की, मुंबईत नव्हे तर दुबईतही बांधता येईल बंगला
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा नवीन टेस्ला मॉडेल वाय चालवत आहे. माहितीनुसार, त्याने नुकतीच ही कार खरेदी केली आहे. Rushiii_12 नावाच्या एका युझरने रोहित शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Rohit Sharma has bought a new Tesla electric car, and just like his previous car, he has chosen its number based on his children’s birth dates. 🥹❤️ 3015 🤍 pic.twitter.com/TqBAIA4RKq — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 7, 2025
रोहित शर्माच्या या नव्या कारचा नंबर 3015 आहे, जो त्याच्या मुलांच्या जन्मतारखांवर आधारित आहे. याआधी घेतलेल्या कारलाही त्याने आपल्या मुलांच्या जन्मतारखेनुसार नंबर दिला होता. त्यामुळे चाहत्यांमध्येही या खास नंबरची चर्चा रंगली आहे.
Tesla Model Y मध्ये अनेक आधुनिक आणि लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. यात 15.4 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, हीटेड व वेंटिलेटेड सीट्स, एंबियंट लाइटिंग, रिअर व्हील ड्राइव्ह सिस्टम, 9 स्पीकर्सचा साउंड सिस्टीम, AEB (ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग), ब्लाइंड स्पॉट कॉलिजन वॉर्निंग, तसेच टिंटेड ग्लास रूफ यांसारखी फीचर्स आहेत.
Tesla Model Y दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे, स्टँडर्ड रेंज आणि लाँग रेंज. एका सिंगल चार्जवर ही इलेक्ट्रिक SUV अंदाजे 500 ते 622 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
टेस्लाने जुलैमध्ये भारतीय बाजारात मॉडेल वाय लाँच केली होती. भारतात या कारची किंमत 59.89 लाख (एक्स-शोरूम) आहे. टॉप-ऑफ-द-लाइन लाँग रेंज व्हेरिएंटची किंमत 67.89 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.