IND vs AUS: Rohit Sharma will do Bhim Parakram! Will destroy Shahid Afridi's world record; Read in detail
Rohit Sharma will break Shahid Afridi’s world record : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दीर्घ विश्रांतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो आता मैदानावर आपल्या बॅटने खोऱ्याने धावा काढण्यास उत्सुक आहे. त्याच्या तंदुरुस्तीतील बदलानंतर, शर्मा 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर, माजी कर्णधार आता 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे. तत्पूर्वी, रोहित शर्माला पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा एक विश्वविक्रम खुणावत आहे.
हेही वाचा : टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचे पुनरागमन नाहीच! ‘या’ माजी खेळाडूचे खळबळजनक विधान चर्चेत
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे, परंतु आता तो एकदिवसीय स्वरूपात आणखी एक मोठा विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम (351) उद्ध्वस्त करण्यासाठी रोहित शर्माला फक्त आठ षटकारांची आवश्यकता आहे. ही आठ षटकार रोहित शर्मा आगामी सीरजमध्ये सहज मारू शकतो.
रोहित शर्माची चेंडू उंचावरून स्टँडवर पाठवण्याची क्षमता जबरदस्त असून त्याची हीच क्षमता त्याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक बनवते. त्याला अनेक गोलंदाज घाबरताट. आजपर्यंत, त्याने एकदिवसीय सामन्यात 344, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 205 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 88 षटकार लागवले आहेत. एकूणच, तो 637 आंतरराष्ट्रीय षटकारांसह जागतिक क्रिकेटमध्ये नंबर वन फलंदाज बनला आहे. जर रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत आठ षटकार ठोकले तर तो केवळ आफ्रिदीचा विक्रम मोडेलच असे नाही तर 350 एकदिवसीय षटकार मारणारा सर्वात जलद फलंदाज देखील बनू शकेल. आफ्रिदीने ही किमया साधण्यासाठी 398 सामने खेळले आहेत, तर रोहित शर्माने आतापर्यंत फक्त 273 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत.
हेही वाचा : ICC Women World Cup 2025 : ऑस्ट्रेलियाचे पाकिस्तानसमोर 222 धावांचे लक्ष्य! बेथ मुनीचे शानदार शतक
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही 19 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करणार असून चाहते या दिग्गजांना पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. भारतीय संघालाही आशा असेल की त्यांचा रोहित शर्मा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतेल आणि यावेळी नवीन विक्रमांना गवसणी घालेल.