फोटो सौजन्य - BCCI
रोहित शर्मा : भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघ विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने T२० विश्वचषक २०२४ च्या (T-20 World Cup 2024) या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर २७ जून रोजी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा (India vs England) वाईट पद्धतीने पराभव करून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. उपांत्य फेरीमध्ये हिटमॅनने अर्धशतक झळकावले आहे. त्याने ३९ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या आहेत. या खेळीनंतर रोहित शर्माने त्यांच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे.
रोहित शर्मा हा एकाच T२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय कर्णधार बनला आहे. जागतिक क्रमवारीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २०२१ मध्ये ३०३ धावा केल्या होत्या. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने २४८ धावा केल्या आहेत. जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. बटलरने २०२२ मध्ये २२५ धावा केल्या होत्या. केन विल्यमसन २१६ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
हिटमॅनने आणखी एक उपांत्य फेरीमध्ये आणखी अर्धशतक ठोकून नवा विक्रम त्यांच्या नावावर केला आहे. रोहित शर्मा हा T-२० विश्वचषकामध्ये जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वात जास्त अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने ११ वेळा अर्धशतक म्हणजेच ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. तर या शर्यतीत भारताचा सलामीवीर फलंदाज विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने हा पराक्रम १० वेळा आहे. त्याने १० अर्धशतक ठोकले आहेत. डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ७ वेळा अर्धशतके झळकावली आहेत. तर जोस बटलरने हा पराक्रम ५ वेळा केला आहे.