फोटो सौजन्य - X
रोहित शर्मा – रितिका सजदेह लव्ह स्टोरी : भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त तो एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून रोहित शर्मा हा मुंबईच्या अनेक हॉटेल्समध्ये त्याच्या पत्नीसोबत झाला त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तो परदेशात गेला आहे. बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे की, रोहित शर्माची पत्नी ही स्टॅन्डमध्ये त्याचा सपोर्टमध्ये नेहमीच बसलेली असते. एवढेच नव्हे तर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह त्याची मॅनेजर देखील आहे. रोहित शर्मा आणि रितिका आहे दोघेही मागील बरेच वर्षांपासून सोबत आहेत.
आता रितिका आणि रोहित या दोघांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लव स्टोरीचा खुलासा केला आहे. हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा या दोघांनी एक शो सुरू केला आहे यामध्ये ‘हू इस द बॉस’ असे या शोचे नाव आहे. या शोच्या पहिल्याच भागामध्ये रोहित शर्मा आणि रितिका सचदेह हे दोघेही पाहुणे म्हणून आले होते.
रोहित शर्माचा लव्ह स्टोरीचा काही भाग हा बऱ्याचदा त्यांनी स्वतः सांगितला होता, तो म्हणजेच किती दोघे एका वेळी भेटले होते पण रोहित शर्मा रितिका सजदेहला कसा प्रपोज केला होता, याबद्दल त्याने कधीच सांगितले नव्हते. हरभजन सिंग आणि गीता बसरा यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दोघांनी रोहित शर्माने त्याच्या पत्नीला कसा प्रपोज केला याबद्दल सांगितले आहे. रोहित शर्मा आणि रितिका हे दोघेही २००८ मध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते.
ENG vs IND : टीम इंडीया अडचणीत! ऑली पाॅपने ठोकले शतक, वाचा दुसऱ्या दिनाचा अहवाल
रोहित शर्मा त्याच्या पत्नीला प्रपोज करण्याची स्टोरी जेव्हा सांगत होते तेव्हा तो म्हणाला की, ‘मी नेहमीच तिला घरातलं जेवण जेवण्यासाठी तिच्या घरून मागवत असे. त्याच्यानंतर एके दिवशी असेच झाले आणि त्यानंतर तिला मी सांगितले की पण मी तुला आज आईस्क्रीम खायला घेऊन जातो. त्यानंतर ते दोघेही गाडीमध्ये बसले आणि निघाले होते यावेळी वरळी गेले दादर गेले बांद्रा गेले पण आईस्क्रीमच्या ठिकाण मात्र काही येत नव्हते.
पुढे त्याने सांगितले की, त्यानंतर रितीकाने रोहितला प्रश्न केला की काय तुझं आइस्क्रीम ठिकाण काही येत नाहीये. त्यानंतर रोहित शर्मा जेव्हा तो लहानपणी ज्या ग्राउंड वर खेळत होता त्या ग्राउंडवर घेऊन गेला. या सगळ्याचे प्लॅनिंग त्यांनी आधीच केली होती आणि त्यानंतर बोरिवलीच्या मैदानावर पोहोचल्यावर त्याने कोपरावर राहून रितिकाला प्रपोज केला होता, ही रोहित शर्माच्या मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.