फोटो सौजन्य – BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस काल पार पडला. या दिनी भारताचा संघ अडचणीमध्ये दिसला, भारताच्या संघाने ज्याप्रकारे कामगिरी केली होती त्याप्रकारे टीम इंडिया कामगिरी करण्यात अपयशी ठरली. ऋषभ पंत याने त्याचे शतक पूर्ण केले तर पहिल्या दिनी शतक झळकावणारा भारताचा कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या दिनी पहिल्याच सेशनमध्ये विकेट्स गमावली. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत ४७१ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताच्या संघाने तीन शतक झळकावले. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या दिनी इंग्लंडच्या संघाने ३ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये हे तीनही विकेट्स जसप्रीत बुमराह याने घेतले आहेत. जॅक क्रॉली याला जसप्रीत बुमराह याने झेलबाद केले. त्याची कॅच करून नायर याने घेतला. तर बेन डकेट हा जसप्रीत बुमराहचा दुसरा शिकार ठरला. कसोटी क्रिकेटचा दिग्गज फलंदाज जो रूट याला जसप्रीत बुमराह याने दहाव्यांदा बाद केले. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि रवींद्र जडेजा हे फेल ठरले.
इंग्लंड संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर जॅक क्रॉली याने ४ धावा करून बाद झाला. तर बेन डेकेट याने अर्धशतक झळकावले. त्याने संघासाठी ६२ धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने ९ चौकार मारले. जो रूट फेल ठरला त्यानं २८ धावा केल्या आणि बुमराहने त्याची शिकार बनवले. या खेळीत त्याने २ चौकार मारले. इंग्लंडचे तीन विकेट्स गेल्यानंतर दुसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर ऑली पॉप आणि हॅरी ब्रुक हे दोघे फलंदाजी करत आहेत.
Stumps on Day 2 in Headingley! England move to 209/3, trail by 262 runs. 3⃣ wickets so far for Jasprit Bumrah ⚡️ Join us tomorrow for Day 3 action 🏏 Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/OcNi0x7KVW — BCCI (@BCCI) June 21, 2025
इंग्लंडच्या संघासाठी पॉप याने शतक झळकावले आहेत. त्याने दुसऱ्या डावामध्ये शतक पूर्ण केले आहेत. १३१ चेंडूमध्ये त्याने १०० धावा पूर्ण केल्या आहेत. तर हॅरी ब्रुक याने आतापर्यंत फक्त १२ चेंडू खेळले आहेत. दुसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर हॅरी ब्रुक आणि ओली पॉप हे दोघे फलंदाजी करत आहेत.