फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी लढणार आहे. या स्पर्धेचे आयोजन २२ नोव्हेंबरपासून करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या संघाने १८ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी भारताचे खेळाडू कसून कसरत मैदानामध्ये करताना दिसत आहेत. नुकताच भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्यामुळे अजूनही मुंबईमध्येच आहे. पहिल्या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही असे वृत्त समोर आले आहेत परंतु यासंदर्भात अजुनपर्यत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही. तर दुसरीकडे एका वृत्तानुसार, शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्याने तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल संघामध्ये नसल्यामुळे आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याला ५ दिवस शिल्लक असताना भारताच्या संघाची पहिल्या सामन्यात कशा प्रकारे प्लेइंग ११ असेल यावर एकदा नजर टाका. टीम इंडिया भारताचे मुख्य खेळाडू संघामध्ये नसल्यामुळे अडचणीत येऊ शकते. त्याच्या अनुपस्थितीत अभिमन्यू इसवरनला टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. जर आपण पर्थ कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचं झालं, तर यशस्वी जैस्वालसह केएल राहुलला संधी मिळू शकते. मात्र, राहुलही जखमी झाला. मात्र त्याची दुखापत गंभीर नाही. त्यामुळे तो पर्थ कसोटीत खेळणार आहे. भारत तिसऱ्या क्रमांकावर रणजी ट्रॉफीचा स्टार अभिमन्यू इसवरनला संधी देऊ शकतो. अभिमन्यूला अद्याप पदार्पण करता आलेले नाही. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
टीम इंडियाची मधली फळी मजबूत आहे. पण टॉप ऑर्डरमध्ये अडचण येऊ शकते. पण भारताचा अनुभवी फलंदाज अष्टपैलू ऋषभ पंत चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि ध्रुव जुरेल हे दोघेही प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. अष्टपैलू खेळाडूची भूमिका रवींद्र जडेजा करत असून तो अनुभवी आहे. त्यामुळे त्यांची जागाही जवळपास निश्चित झाली आहे.
🚨 SHUBMAN GILL RULED OUT OF THE 1ST TEST VS AUSTRALIA. 🚨
– The BCCI is hopeful Gill will recover on time for the 2nd Test. (Express Sports). pic.twitter.com/Xne1npBFzZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 16, 2024
वेगवान गोलंदाज हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत तो टीम इंडियाचा कर्णधार असेल. रोहित पर्थ कसोटीत खेळला नाही तर कमान बुमराहच्या हाती असेल. बुमराहसोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. टीम इंडिया आकाश दीपचाही विचार करू शकते.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इसवरन, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा/वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.