Rohtak boxing academy case: Indecent act by female coach; FIR filed against junior boxer alleging sexual harassment
Rohtak boxing academy case : भारतातील क्रीडा क्षेत्रातील वाद एकामागून एक समोर येत असतात, ते थांबायच नाव घेत नाहीयेत. कुस्तीनंतर आता एका अल्पवयीन बॉक्सरनकडून बॉक्सिंगमधील महिला प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप रोहतक येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआय) केंद्रातील राष्ट्रीय बॉक्सिंग अकादमी (एनबीए) च्या महिला प्रशिक्षकावर करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीच्या पालकांकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, वारंवार ‘मानसिक आणि शारीरिक छळ’ होत असल्याने ती खूप तणावात गेली आहे. या प्रकरणाबद्दल विचारले असता, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी देखील १७ वर्षीय पीडित मुलीकडून धमकावण्याच्या आणि थप्पड मारण्याच्या घटनांबद्दल तक्रारी मिळाल्याचे मान्य करण्यात आले आहेत. परंतु, एफआयआरमध्ये केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल त्यांनी काही एक माहिती देण्यास नकार दिला आहे.
दोन्ही संघटनांकडून ससंगण्यात आले आहे की, त्यांच्या अंतर्गत तपासात प्रशिक्षकाविरुद्ध कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. या प्रशिक्षक सध्या ज्युनियर आणि तरुण बॉक्सर्ससाठी राष्ट्रीय शिबिर आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे समोर येत आहे. रोहतक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पीडितेने म्हटले आहे की, “प्रशिक्षकाकडून एकदा जबरदस्तीने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, तिला अनेक वेळा मारहाण देखील केली, तिची कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आणि इतर बॉक्सर्ससमोर तिला ‘वाईट चारित्र्य’ असेही संबोधले, ज्यामुळे ती एकटी पडली.”
प्रशिक्षकाविरुद्धची तक्रार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (जाणूनबुजून दुखापत) आणि ३५१ (३) (गुन्हेगारी धमकी) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या कलम १० (तीव्र लैंगिक अत्याचार) अंतर्गत नोंदवली गेली आहे. गरज पडल्यास तपासात मदत करेल असे एसएआयकडून संगण्यात आले आहे.
सोनीपत येथील एसएआयच्या प्रादेशिक केंद्राकडून या संदर्भात सांगण्यात आले की, “आम्हाला अद्याप कोणत्याही एफआयआरची प्रत मिळालेली नाही. एनबीए रोहतकमधील एका महिला बॉक्सरने २४ एप्रिल २०२५ रोजी ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये तिने २५ मार्च २०२५ ते ३ एप्रिल २०२५ या कालावधीत आयर्लंडमध्ये पार पडलेल्या निमंत्रण बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान एका महिला प्रशिक्षकाने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या तक्रारीत लैंगिक छळाचा कोणताही आरोप करण्यात आला नव्हता.”