वैभव सुरवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Ind vs Ing under 19 : भारतीय १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघांमध्ये पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ४८ धावांची तुफानी खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीने ४५ धावांची खेळी साकारली. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला अर्धशतकाने हुलकावणी दिली.
नॉर्थम्प्टनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरवात फारशी सुरवात चांगली झाली आहे. आयुष म्हात्रे एकही धाव न काढता माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्राने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांनी दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी केली.
हेही वाचा : IND Vs ENG : खराब क्षेत्ररक्षणाचा फटका! यशस्वी जयस्वालला मिळाली ‘ही’ शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात ३४ चेंडूंचा सामना केला असून ज्यामध्ये त्याने ५ चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी करून ४५ धावा केल्या. वैभव सूर्यवंशी अर्धशतक ठोकण्यापूर्वीच पव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात वैभवने १३२ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. गेल्या सामन्यात वैभवने ४८ धावांची खेळी केली होती. या दरम्यान त्याने ५ षटकार खेचले होते. वैभवने इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध २५२ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत.
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर शून्यावर माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्राने ६८ धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशी ४८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर विहानने मोलयराज सिंग चावडासोबत अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला आणि तो ११९ धावांवर २२ धावा काढून बाद झाला.
विहान मल्होत्र ४९ धावांवर आऊट झाला. त्यानंतर लगेचच अभिज्ञान कुंडूही ३२ धावांकरून माघारी परतला. भारतीय संघाने आपला पाचवा बळी १७१ धावांवर गामवाला. भारतीय संघाने ३३ षटकांत ५ गडी गमावून १७४ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जॅक होमने २, अॅलेक्स ग्रीनने २ आणि एएम फ्रेंचने १ बळी घेतला आहे.