टिम इंग्लंड(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्स ने जिंकला आहे. आता २ जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरवात होणार ही. त्याआधी इंग्लंडने आपला प्लेइंग-११ जाहीर केला आहे. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने आपल्या संघात कोणताच बदल केलेला नाही. या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरचा संघामध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु, त्याला अद्याप प्लेइंगमध्ये स्थान मिळवण्यासाठी वात पहावी लागणार आहे.
कुटुंबातील आपत्कालीन परिस्थितीमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला सोमवारी एजबॅस्टन येथे होणाऱ्या सराव सत्राचा भाग होता आले नाही. त्यानंतर त्याला या कसोटी सामन्याच्या प्लेइंग-११ मध्ये देखील समाविष्ट करण्यात आले नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानकडून सोमवारी सांगण्यात आले की, “कुटुंबातील आपत्कालीन परिस्थितीमुळे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आज, सोमवार ३० जून रोजी एजबॅस्टन येथे इंग्लंडच्या कसोटी संघाच्या सराव सत्रात सामील होणार नाही. तो उद्या (मंगळवार) पुन्हा संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.”
आर्चर गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या गोलंदाजीच्या हातातील कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याने चार वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आता त्याला परतण्यासाठी अजून देखील वाट पाहावी लागणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने संघात कोणतेही बदल केलेले नाहीत.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीतील चौथ्या डावात इंग्लंडला जिंकण्यासाठी ३७१ धावा करायच्या होत्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी ही लक्ष्य सहज गाठले आणि विजय संपादन केला. इंग्लंडने हा सामना ५ विकेट गमावून जिंकला होता. आता दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
हेही वाचा : IND Vs ENG : खराब क्षेत्ररक्षणाचा फटका! यशस्वी जयस्वालला मिळाली ‘ही’ शिक्षा; नेमकं प्रकरण काय?