RR Vs GT: Rahul Dravid with a broken leg scored, Vaibhav Sooryavanshi's century pleases the coach, watch the video
RR Vs GT : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४७ सामने खेळवले आहेत. काल झालेल्या ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानने गुजरात टायटन्सला पराभूत केले. गुजरातने २०९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थानने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर १६ व्या षटकात लक्ष्य पूर्ण केले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १०१ धावांच्या खेळीने एक इतिहास रचला. त्याच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले.
वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूत आपले शतक झळकावले आहे. वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासात शतक झळकवणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने युसूफ पठाणचा विक्रम देखील मोडला आहे. युसूफ पठाणने आयपीएलमध्ये ३७ चेंडूत शतक ठोकले होते. पण या सामन्यात त्याने ३५ चेंडूत शतक ठोकून पठाणचा हा विक्रम मोडीत काढला. वैभवने त्याच्या खेळीत ७ चौकार आणि ११ षटकार लगावले आहे.
हेही वाचा : DC vs KKR : आज डीसी आणि केकेआर भिडणार, खेळपट्टीच्या अहवालासह जाणून घ्या कोण राखणार वर्चस्व?
वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याची अद्भुत खेळीला विश्राम प्रसिद्ध कृष्णाने दिला. तो ३७ चेंडूत १०१ धावा करून माघारी परतला. वैभवची ही खेळी पाहून आरआर प्रशिक्षक राहुल द्रविड खूप आनंदी झालेले दिसून आले आहेत. सध्या राहुल द्रविडच्या पायाला दुखापत झालेली आहे. असे असून देखील, वैभव सूर्यवंशीच्या शतकावर त्याने त्याच्या व्हीलचेअरवरून चक्क उडीच मारली.
गुजरात टायटन्सविरुद्ध वैभव सूर्यवंशीचे धडाकेबाज शतक पूर्ण केले. या शतकाचा आनंद राजस्थानचे प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील साजरे केले. या काळात तो त्याच्या पायाची दुखापतही विसरला. वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत शतक पूर्ण करताच, तो आपल्या व्हीलचेअरवरून उठला आणि आनंद साजरा करायला सुरवात केली. राहुल द्रविडचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rahul Dravid’s cold celebration said it all.
India’s future is in safe hands.#vaibhavsuryavanshi #RRvsGT pic.twitter.com/cIQM8sxBDz
— Sachin Rangrao Raut (@iamSachinRaut) April 28, 2025