फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मिडीया
राजस्थान रॉयल्सचा विरुद्ध मुंबई इंडियन्स : आज सवाई मानसिंह मैदानावर राजस्थान रॉयल्सचा संघ मुंबई इंडियन्सशी लढणार आहे. मागील सामन्यात राजस्थानच्या संघाने जोर दाखवला होता, तर मुंबई इंडियन्सचा संघ पाच विजयासह आता संघाचे सलग सहाव्या विजयाकडे लक्ष असेल. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने सर्वानाच चकित केले होते. संघाचा युवा फलंदाज सूर्यवंशीने शतक झळकवले होते. आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. आजच्या सामन्यात रियान परागने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामान्यांच्या पराभवानंतर संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.
आजच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. सूर्यकुमार यादव सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. आजच्या सामन्यात तो कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल. रायन रिकेल्टनने देखील मागील सामन्यांमध्ये कमालीची खेळी खेळली होती तेव्हा त्याने अर्धशतक झळकावले होते. कॉर्बिन बॉश याला मागील सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती त्याने संघासाठी चांगली फिनिशरची भूमिका साकारली होती.
🚨 Toss 🚨@rajasthanroyals won the toss and opted to bowl first against @mipaltan
Updates ▶️ https://t.co/t4j49gXHDu#TATAIPL | #RRvMI pic.twitter.com/H3Z2V7mkDx
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये काही बदल आज करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यात संघामध्ये तीन खेळाडूंमध्ये बदल करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात कार्तिकेया सिंह, फझलहक फारुकी आणि आकाश मधवाल या तीन खेळाडूंना संघामध्ये संधी देण्यात आली आहे. मागील सामन्यात युद्धवीर सिंहला संधी दिली होती पण त्याने तेव्हा जास्त धावा दिल्या होत्या त्यामुळे त्याला आज प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली नाही.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. संघाने सलग पाच सामन्यात विजय मिळवून सध्या मुंबईचे १२ गुण आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या आठव्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यत १० सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवून ६ गुण आहेत. आज जर मुंबईचा संघ विजयी झाला तर संघ पहिल्या स्थानावर विराजमान होईल. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सच्या संघाने आजच्या सामन्यात विजय मिळाल्यास प्लेऑफच्या आशा जिवंत राहतील.
वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तिक्षना, कार्तिकेया सिंह, फझलहक फारुकी, आकाश मधवाल
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.