फोटो सौजन्य - Rajasthan Royals/Punjab Kings
पंजाब किंग्स विरूद्ध राजस्थान राॅजल्स : आयपीएल 2025 रिस्टार्ट झाली आहे पण कालचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होताय आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. आजचा सामना हा पंजाब किंग्स विरूद्ध राजस्थान राॅजल्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकुन पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना पंजाब किंग्सच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे कारण आजच्या सामन्यामध्ये पंजाब किंग्सच्या संघाने विजय मिळवल्यास गुणतालिकेची स्थिती आणखीनच मनोरंजक होईल. तर राजस्थान राॅयल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे.
आजच्या सामन्यात राजस्थान राॅयल्सच्या संघाचा कर्णधार संजु सॅमसनचे पुमरागमन झाले आहे. आजच्या सामन्यात तो कशी कामगिरी करेल याकडे चाहत्याचे लक्ष असणार आहे. संजु सॅमसन दुखपतीमुळे बराच काळ संघाबाहेर राहिला आहे. त्याचबरोबर आज युवा खेळाडु क्वेना मफाका याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर तुषार देशपांडेला पुन्हा प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. पंजाब किंग्सच्या संघामध्ये मिचेल ओवन याला संघामध्ये स्थान मिळाले आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to bat against @rajasthanroyals
Updates ▶️ https://t.co/HTpvGew6ef #TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/IHU5EGRfAK
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
आजच्या सामन्यामध्ये पंजाब किंग्सच्या दोन्ही सलामीविर फलंदाजांवर आज चाहत्यांची नजर असणार आहे. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन यांनी संघासाठी कमालीची फलंदाजी या सिझनमध्ये केली आहे. राजस्थानच्या संघाने या सिझनमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. वैभव सुर्यवंशी याने संघासाठी शतक झळकावले होते. संजू सॅमसंग हा दुखापतिनंतर पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहे त्यामुळे त्याच्या कामगिरीवर आज नजर असणार आहे. श्रेयस अय्यरणे या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्यामुळे तो कशी खेळी दाखवेल ते देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल. राजस्थान रॉयल्स साठी जोफ्रा आर्चर संघाचा भाग नाही त्यामुळे त्याचे जागेवर तुषार देशपांडेला संघात स्थान मिळाले आहे.
या परदेशी संघाने विराट कोहलीला दिली ‘कसोटी’ खेळण्याची ऑफर, निवृत्तीनंतर आली मोठी बातमी
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रियान पराग, तुषार देशपांडे, आकाश मधवाल, फजलहक फारुकी, वांनिदू हंसरंगा, क्वेना मफाका
श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), मिचेल ओवन, नेहल वढेरा, शशांक सिंग, अजमतुल्लाह उमरजाई, माकों यान्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट