फोटो सौजन्य - X
विराट कोहली : विराट कोहली हा भारतीय क्रिकेटसाठी एक ब्रँड आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याने त्याचे नाव फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये त्याच्या कामगिरीने उत्तर दिले आहे. त्याच्या या निवृत्तीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. विराट कोहलीने आयपीएल २०२५ दरम्यानच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता तो भारतासाठी लाल चेंडूने खेळू शकणार नाही. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटचा हा निर्णय धक्कादायक होता. विराट आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर किंग कोहलीला एक मोठी ऑफर मिळाली आहे. त्याला इंग्लंडच्या काउंटी संघाने कसोटी क्रिकेट खेळण्याची ऑफर दिली आहे.
विराट कोहलीला काउंटी संघ मिडलसेक्सकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. मिडलसेक्सचे क्रिकेट संचालक अॅलन कोलमन म्हणाले की, “विराट कोहली हा त्याच्या पिढीतील सर्वात प्रतिष्ठित खेळाडू आहे, त्यामुळे अर्थातच आम्हाला या संभाषणात रस आहे.” काउंटी व्यतिरिक्त, विराटने मिडलसेक्ससाठी वन डे कपमध्ये भाग घ्यावा अशी अॅलन कोलमनची इच्छा आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराटने एक मोठा निर्णय घेतला आहे. तथापि, विराट काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाईल अशी शक्यता फारच कमी आहे.
विराट कोहलीने २०१८ मध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यात रस दाखवला आहे. २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने सरे संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण मानेला झालेल्या दुखापतीमुळे विराट कोहलीचा हा करार रद्द करण्यात आला. अनेक भारतीय क्रिकेट खेळाडू इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. सचिन तेंडुलकर त्याच्या काळात यॉर्कशायर संघाकडून खेळला.
आजकाल चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि करुण नायरसारखे खेळाडूही तिथे खेळतात. काउंटी क्रिकेटमुळे खेळाडूंना इंग्लिश परिस्थितीत खेळण्याचा अनुभव मिळतो. तथापि, आतापर्यंत विराट कोहलीने काउंटी क्रिकेटमध्ये भाग घेतलेला नाही. त्यांच्या नावाची चर्चा अनेक वेळा झाली, पण त्यांनी कधीही त्यात भाग घेतला नाही. काउंटी क्रिकेटमुळे परदेशी खेळाडूंना चांगला अनुभव मिळतो आणि फॉर्ममध्ये परतण्याची संधी मिळते. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ कसोटी सामन्यांमध्ये ६३.१३ च्या सरासरीने ५०५ धावा केल्या आहेत. या हंगामात विराटने बंगळुरूसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.