फोटो सौजन्य - Proteas Men
दक्षिण आफ्रिकेचा संघ WTC फायनलसाठी जाहीर : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुढील महिन्यात दोन संघ आमने-सामने येणार आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये भारताच्या संघाला पराभूत करून फायनलमध्ये स्थान पक्के गेले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट फायनलच्या सामन्यात आमने-सामने असणार आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ बवुमाच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्यात खेळणारा खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे यामध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे यावर एकदा नजर टाका.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टेंबा बावुमा याचे नेतृत्वात तीनही फॉरमॅटमध्ये चांगले कामगिरी केली आहे. टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेचे संघाने फायनल गाठली होती तर वर्ल्ड टेस्ट फायनलमध्ये आणखी एकदा त्यांनी प्रवेश केला आहे. संघाबद्दल सांगायचं झाले तर एडन मारक्रम, मार्को यान्सन, ट्रिस्टन स्टॅब्स यांसारख्या अनुभवी आणि दमदार फॉर्ममध्ये असलेला खेळाडूंचा या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. एडन मार्क्रम याने लखनऊ सुपर जॉईंट्स साठी या सीझनमध्ये कमालीची फलंदाजी केली आहे. तर मार्को जॉन्सन याने पंजाब किंगसाठी चांगली गोलंदाजी करून संघाला कठीण काळामध्ये विकेट्स मिळवून दिले आहेत.
ट्रिस्टन स्टॅब्स हा दिल्ली कॅपिटल्स साठी ट्रम्प कार्ड ठरला आहे. स्टॅब्स याने संघासाठी कठीण काळामध्ये चांगल्या धावा आणि मोठे शॉर्ट मारण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चा फायनल च्या सामन्यांमध्ये हे तीन खेळाडू संघासाठी चांगली कामगिरी करतील अशी संघाला अपेक्षा असेल.
Defining moments. Unshakable character. This is what Test cricket’s all about 🏏.
As we look to the battle that awaits, we acknowledge growth and reward perseverance 💪👏.
This isn’t just a squad; it’s a statement of intent and a true reflection of grit 🇿🇦.#WTC25 #WozaNawe… pic.twitter.com/qa1de9NFWX
— Proteas Men (@ProteasMenCSA) May 13, 2025
दक्षिण आफ्रिकेचे इतर खेळाडू बद्दल सांगायचं झाले तर आयपीएल मध्ये कार्बिन बॉश आणि रायल रिकलटन या दोघांनी मुंबई इंडियन्स साठी चांगले कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कागिसो रबाडा, केशव महाराज यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. संघाचा कर्णधार टेंबा बावुमा हा देखील एक संघासाठी मजबूत फलंदाज आहे.
टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, मार्को जानसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, काइल व्हेरेन, डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, सेनुरन मुथुसामी, डेन पॅटरसन.