फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सचिन तेंडुलकर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान सुरू झाले आहे. महाराष्ट्रामधील जनता आज सकाळपासून मतदान करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरही आपले कर्तव्य बजावत मतदान करण्यासाठी पोहोचला. यावेळी, भारतीय दिग्गज पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत दिसले. मतदान केल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी बोटावर शाई लावून पोझ दिली. तेंडुलकरच्या मतदानाचे सर्व व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेद्वारे शेअर करण्यात आले आहेत. मतदान केल्यानंतर तेंडुलकर यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहनही केले. त्याचबरोबर त्याने त्याच्या सोशल मीडियावर पत्नी आणि मुलीसोबतचा शाई दाखवत फोटो शेअर केला आहे.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
मतदान केल्यानंतर एएनआयशी बोलताना तेंडुलकर म्हणाले, “मी गेल्या काही काळापासून ECI (भारतीय निवडणूक आयोग) चे चिन्ह आहे. मी जो संदेश देत आहे तो मतदान करा. ही आपली जबाबदारी आहे, मी सर्वांना विनंती करतो. मी विनंती करतो की तुम्ही घराबाहेर पडा आणि मतदान करा. तुम्हाला सांगतो की, सचिन तेंडुलकर अनेकदा अशा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेताना दिसला आहे. यावेळीही त्यांनी जबाबदारी चोख पार पाडली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दिग्गज तेंडुलकर अशा कामांमध्ये अधिकाधिक दिसू लागला आहे.
आज सकाळपासून मतदान केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक मोठे कलाकार, क्रिकेटर सकाळपासून रांगेमध्ये उभे राहून मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार, राजकुमार राव, कबीर खान या कलाकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख त्याच्या परिवारासोबत मतदान करण्यासाठी गेला आहे.
मतदान केल्यानंतर सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि फोटोवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, विचार करण्याची आणि अभिमानाने आपली शाई दाखवण्याची वेळ आली आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे! यासोबत त्याने त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत फोटो शेअर केले आहेत.
It’s time to think, and proudly show your ink. Every vote matters! 🗳️
Have you done your part?#MaharashtraElection2024 #ReadyToVote #MakeItCount pic.twitter.com/dWDb7RWUqV— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 20, 2024
सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 329 डावांमध्ये त्याने 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या. या कालावधीत त्याने 51 शतके आणि 68 अर्धशतके केली. याशिवाय वनडेच्या 452 डावांमध्ये सचिनने 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या ज्यात 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. उर्वरित टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सचिनने 10 धावा केल्या. गोलंदाजी करताना सचिनने कसोटीत 46, एकदिवसीय सामन्यात 154 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1 बळी घेतला. सचिनने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि 2013 मध्ये त्याचा शेवट झाला.