Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar : स्वच्छ भारत मोहिमेला सचिनची साथ; कचरा व्यवस्थापनासाठी Recykal सोबत नवी भागीदारी

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने Recykal या कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनीत रणनीतिक गुंतवणूक केली आहे. एक अब्ज लोकांमध्ये कचरा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 13, 2026 | 02:24 PM
Sachin Tendulkar : स्वच्छ भारत मोहिमेला सचिनची साथ; कचरा व्यवस्थापनासाठी Recykal सोबत नवी भागीदारी

Sachin Tendulkar : स्वच्छ भारत मोहिमेला सचिनची साथ; कचरा व्यवस्थापनासाठी Recykal सोबत नवी भागीदारी

Follow Us
Follow Us:
  • सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश मिळते
  • कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येईल
  • Recykal ही हैदराबादस्थित कंपनी
 

भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आता पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाच्या मोहिमेत सहभागी झाला आहे. भारतातील कचरा व्यवस्थापन आणि सर्क्युलर इकॉनॉमी क्षेत्रात कार्यरत असलेल्या Recykal या तंत्रज्ञान कंपनीमध्ये सचिनने रणनीतिक गुंतवणूक केली आहे. देशातील एक अब्ज लोकांमध्ये कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Recykal ने 13 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात घोषणा केली. कंपनीने यापूर्वी जून 2026 मध्ये 23 दशलक्ष अमेरिकी डॉलरची (सुमारे 190 कोटी रुपयांची) ब्रिज फंडिंग उभारली होती. सचिन तेंडुलकरची गुंतवणूक ही याच निधी उभारणीचा विस्तार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून कचरा ही केवळ फेकून देण्याची वस्तू नसून त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो, हा विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कचरा संकलन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक सवयी दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यावर भर दिला जाणार आहे.

सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश मिळते

या सहकार्याबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला की, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत शिकलो की, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिस्तीतूनच दीर्घकालीन यश मिळते. स्वच्छ भारत घडवण्यासाठीही हेच तत्त्व लागू होते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील समस्येवर उपाय शोधण्याची Recykal ची भूमिका मला भावली. एक अब्ज लोकांमध्ये जबाबदार वर्तनाची सवय निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट मला विशेष भावले.

रणनीतिक गुंतवणूकदार म्हणून सचिन देशभरात जबाबदार कचरा व्यवस्थापनाची चळवळ उभी करण्यासाठी योगदान देणार आहे. कचरा योग्य ठिकाणी जमा करणे, पुनर्वापरासाठी पाठवणे आणि सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येईल

Recykal चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अभय देशपांडे यांनीही या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला. तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि नागरिकांच्या वर्तनातील बदल यांच्या माध्यमातून पॅकेजिंग कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येईल, असे त्यांनी सांगितले. सचिनच्या शिस्तीचा, प्रामाणिकपणाचा आणि लोकांना एकत्र आणण्याच्या क्षमतेचा या मोहिमेला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

2015 मध्ये स्थापन झालेली Recykal ही हैदराबादस्थित कंपनी डिजिटल प्लॅटफॉर्म, डिपॉझिट रिटर्न सिस्टीम (DRS) आणि पुनर्वापर योग्य साहित्याच्या व्यापाराच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने आतापर्यंत 30 लाख मेट्रिक टनांहून अधिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी योगदान दिले आहे. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर, सॅमसंग आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या 650 ब्रँड्ससह पाच हजारांहून अधिक कचरा संकलक आणि पुनर्वापर करणाऱ्यांसोबत कंपनी काम करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सचिन तेंडुलकरने कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे?

    Ans: सचिन तेंडुलकरने भारतातील कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या Recykal या कंपनीत रणनीतिक गुंतवणूक केली आहे.

  • Que: Recykal कंपनीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

    Ans: देशातील एक अब्ज लोकांमध्ये कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक सवयी निर्माण करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

  • Que: Recykal ने यापूर्वी किती निधी उभारला होता?

    Ans: कंपनीने जून 2026 मध्ये 23 दशलक्ष अमेरिकी डॉलरची ब्रिज फंडिंग उभारली होती.

Web Title: Sachin tendulkar recykal waste management investment rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Digital news
  • Garbage Issue
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम
1

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.