
Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत 'बॅटोग्राफी' चा अनोखा संगम
मास्टर-ब्लास्टर, क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपल्या कारकिर्दीतील काही अनमोल आठवणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला भेट स्वरुपात देणार आहे. यामध्ये सचिनच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांच्या ऐतिहासिक कामगिरीशी संबंधित बॅट्सचाही समावेश आहे. सचिनच्या एकूण २६ बॅट्स संग्रहालयात ठेवण्यात येणार असून, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष कार्यक्रमात ‘बॅटोग्राफी’ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
सचिनने १३ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने कारकिर्दीतील अखेरचा म्हणजेच २०० वा कसोटी सामना खेळला होता. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
एमसीए संग्रहालयात प्रथमच ‘बॅटोग्राफी’ या अनोख्या संकल्पनेतून सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. सचिनच्या २६ बॅट्ससह त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांशी संबंधित आठवणी आणि वस्तू प्रदर्शनात मांडल्या जातील.
प्रत्येक बॅट सचिनच्या कारकिर्दीतील एका महत्त्वपूर्ण टप्प्याची आठवण करून देणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना त्याच्या ऐतिहासिक कामगिरीमागील आठवणी जवळून अनुभवता येणार आहेत.
IPL 2027: अखेर सस्पेन्स संपला! Hardik Pandya पंजाबच्या ताफ्यात, तर Arshdeep ची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री; किती कोटींची डील?
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचे योगदान त्याने केलेल्या विक्रमांपुरते मर्यादित नाही. त्याचा प्रवास लाखो क्रिकेटप्रेमींच्या आठवणींमध्ये कायम आहे. या बॅट्स त्याच्या प्रवासातील अत्यंत खास आठवणी आहेत.
‘बॅटोग्राफी’च्या माध्यमातून संग्रहालयात एक अनोखा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. सचिनने या अनमोल वस्तू एमसीएसोबत सामायिक करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
बॅट्ससोबतच सचिनच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांशी संबंधित हेल्मेट, जर्सी, वैयक्तिक नोंदी आणि अन्य आठवणींच्या वस्तूही प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. सचिनच्या असामान्य क्रिकेट प्रवासाचा हा ठेवा कायमस्वरूपी संग्रहालयात जतन केला जाणार आहे.
IND vs NZ: कर्णधार बदलला, संघही बदलला! आता मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; भारत-न्यूझीलंड चौथा वनडे कधी अन् कुठे रंगणार?
Ans: सचिन तेंडुलकरच्या एकूण २६ ऐतिहासिक बॅट्स एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
Ans: १६ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष कार्यक्रमात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Ans: सचिनच्या २६ बॅट्ससोबत हेल्मेट, जर्सी, वैयक्तिक नोंदी आणि कारकिर्दीतील महत्त्वाच्या आठवणींशी संबंधित वस्तू पाहायला मिळतील.