
कोण आहे Sachin Yadav? (Photo Credit- X)
अंतिम फेरीत सचिनने पहिल्याच प्रयत्नात ८६.२७ मीटरचा वैयक्तिक विक्रम केला. त्याचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला, तर तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८५.७१ मीटरची, चौथ्या प्रयत्नात ८४.९० मीटरची आणि पाचव्या प्रयत्नात ८५.९६ मीटरची कामगिरी केली. अखेरच्या प्रयत्नात तो ८०.९५ मीटरपर्यंत भाला फेकू शकला.
86.27m – fourth in the Men’s Javelin Throw final 👏🚀 Sachin Yadav – from UP, to the World Athletics Championships stage 💙pic.twitter.com/Mg0nlbCodm — Lucknow Super Giants (@LucknowIPL) September 18, 2025
सचिन यादव उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने याच वर्षी एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले होते. सचिन पहिल्यांदा प्रकाशझोतात आला जेव्हा त्याने ७३व्या ऑल इंडिया पोलीस ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ८४.२१ मीटर लांब भाला फेकून ३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. हा विक्रम १९९४ मध्ये सतबीर सिंग यांच्या नावावर होता, ज्यांनी ७९.८८ मीटर भालाफेक केली होती. सचिन सध्या उत्तर प्रदेश पोलीसमध्ये कार्यरत आहे आणि नीरज चोप्राप्रमाणेच ९० मीटरचा टप्पा गाठण्याचे त्याचे स्वप्न आहे.
जागतिक ऍथलेटिक्सच्या अंतिम फेरीत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा आठव्या स्थानावर राहिला. त्याचा सर्वोत्तम थ्रो ८४.०३ मीटर होता. पहिल्या प्रयत्नात त्याने ८३.६५ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ८४.०३ मीटर, तिसऱ्या प्रयत्नात फाऊल, चौथ्या प्रयत्नात ८२.८६ मीटर आणि पाचव्या प्रयत्नात पुन्हा फाऊल केला. त्याचवेळी, अरशद नदीमने फक्त चार थ्रो केले. त्याचा पहिला थ्रो ८२.७३ मीटर आणि दुसरा थ्रो ८२.७५ मीटर होता, तर त्याचे दोन प्रयत्न फाऊल झाले.