Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुची बाबू स्पर्धेपूर्वीच तामिळनाडूला मोठा झटका! कर्णधार साई किशोर दुखापतीमुळे जायबंदी

लवकरच अखिल भारतीय बुची बाबू स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वीच तामिळनाडूला मोठा झटका बसला आहे. तमिळनाडूचा कर्णधार आर साई किशोर दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 16, 2025 | 09:25 PM
Big blow to Tamil Nadu even before the Buchi Babu tournament! Captain Sai Kishore out due to injury, Shahrukh Khan to take over as captain

Big blow to Tamil Nadu even before the Buchi Babu tournament! Captain Sai Kishore out due to injury, Shahrukh Khan to take over as captain

Follow Us
Follow Us:

Sai Kishore out of Buchi Babu tournament due to injury  : अखिल भारतीय बुची बाबू स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच तामिळनाडूला मोठा झटका बसला आहे. तमिळनाडूचा कर्णधार आर साई किशोर दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी साई किशोर बरा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत तो बरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मागील रविवारी चेन्नईतील गुरु नानक कॉलेज ग्राउंडवर खेळण्यात आलेल्या फर्स्ट-डिव्हिजन क्लब सामन्यात एम शाहरुख खानच्या चेंडूवर फॉलो-थ्रू दरम्यान ड्राइव्ह मारून चेंडू पकडत असताना साई किशोरला हाताला दुखापत झाली होती. दुलीप ट्रॉफीमध्ये साई किशोर दक्षिण विभागाचा एक महत्वाचा भाग आहे. स्पिन ऑलराउंडर आर साई किशोर ४ सप्टेंबरपासून बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याच्या मोहिमेला सुरवात करणार आहे.

हेही वाचा : देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

साई किशोरची कामगिरी

साई किशोरने तमिळनाडूसाठी खेळलेल्या ४८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने गोलंदाजीत २३.५७ च्या सरासरीने एकूण २०३ बळी टिपले आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ५७ धावा देत ७ विकेट्स ही राहिली आहे. त्याने १३ वेळा एका डावात पाच विकेट्स स्टिच एक वेळ एका सामन्यात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. फलंदाजीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने १४.३१ च्या सरासरीने ८१६ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८१ धावा राहिली आहे.

साई किशोरच्या जागी शाहरुख खान कर्णधार

साई किशोर जखमी झाल्यामुळे त्याच्या जागी शाहरुख खानला संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. शाहरुख खानला तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन ११ चा कर्णधार बनवले आहे. या स्पर्धेत तामिळनाडूतील दोन संघ सहभागी होणार आहेत. फलंदाज प्रदोष रंजन पॉलला दुसऱ्या संघाचा कर्णधार बनवले आहे. तर आंद्रे सिद्धार्थला उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

बुची बाबू स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. ज्यामध्ये सर्व चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ त्याच्या गटात तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर गटातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. नॉकआउटमधील सर्व सामने ४ दिवसांचे असणार आहेत. ज्यामध्ये दररोज ९० षटकांचा खेळ खेळवला जाईल.

हेही वाचा : Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

टीएनसीए इलेव्हन संघ

एम शाहरुख खान (कर्णधार), बूपती वैष्ण कुमार (उपकर्णधार), एम. सिद्धार्थ, बी. सचिन, तुषार रहेजा, किरण कार्तिकेयन, एस. मोहम्मद अली, एस. हृतिक ईश्वरन, एस. आर. आतीश, एस. लक्ष्य जैन, पी. विघ्नेश, आर. सोनू यादव, डी. टी. चंद्रशेखर, डी. दीपेश, जे. प्रेम कुमार, ए. एसाक्किमुथु, टी. डी. लोकेश राज.

TNCA अध्यक्ष इलेव्हन संघ: प्रदोष रंजन पॉल (कर्णधार),बी इंद्रजित, विजय शंकर, आंद्रे सिद्धार्थ (उपकर्णधार), आर. विमल खुमर, एस. राधाकृष्णन, एस. लोकेश्वर, जी. अजितेश, जे. हेमाचुडेसन,सी.व्ही. अच्युथ, एच. त्रिलोक नाग, आर.एस. अंबरीश, पी. सरवण कुमार, पी. विद्युत, के. अभिनव.

Web Title: Sai kishore out of action due to injury even before buchi babu competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 09:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.