देवाल्ड ब्रेविस आणि आर अश्विन(फोटो-सोशल मीडिया)
Clarification from CSK on Devald Brevis’ contract : आयपीएल २०२५ दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने हंगामाच्या मध्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक युवा फलंदाज देवाल्ड ब्रेविसचा संघात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ब्रेविसने सीएसकेसाठी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती. तथापि, हंगाम संपल्यानंतर लगेचच, रविचंद्रन अश्विनने केलेल्या एका विधानाने मोठा गोंधळ उडाला आहे. यानंतर आता थेट सीएसकेला समोर येत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
माजी भारतीय दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या युट्युब चॅनेलवर एक मोठे विधान केले होते. त्याने म्हटले होते की चेन्नई सुपर किंग्ज देवाल्ड ब्रेविसला समाविष्ट करण्यासाठी अधिक पैसे मोजण्यास तयार आहे. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. हे प्रकरण गंभीर होत असल्याचे बघून चेन्नई सुपर किंग्जकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. सीएसके ने देवाल्ड ब्रेविसच्या करारावर स्पष्टीकरण जारी केलेया आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची करार प्रक्रिया लीगच्या नियमांनुसार होतो.
सीएसकेने एका निवेदनात म्हटले आहे की, चेन्नई सुपर किंग्ज स्पष्ट करते की टाटा इंडियन प्रीमियर लीग २०२५ दरम्यान डेवाल्ड ब्रेव्हिसला रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून करारबद्ध करण्याच्या प्रक्रियेदरम्यान फ्रँचायझीकडून करण्यात आलेल्या कृती आयपीएलच्या नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडल्या.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, एप्रिल २०२५ मध्ये, डेवाल्ड ब्रेव्हिसला जखमी गुर्जपनीत सिंगच्या बदली खेळाडू म्हणून २.२ कोटी रुपयांच्या लीग फीमध्ये करारबद्ध केले गेले होते. सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२५ च्या खेळाडूंच्या लिलावात गुर्जपनीत सिंगला २.२ कोटी रुपयांच्या किमती खरेदी करण्यात आले होते. आयपीएलच्या सध्याच्या नियमांनुसार, बदली खेळाडूची कराराची रक्कम ही तो ज्या खेळाडूची नियुक्ती करणार आहे त्याच्या किमतीपेक्षा जास्त असू नये.
लिलावात ब्रेव्हिस विकता आला नव्हता. १८ एप्रिल रोजी त्याला करारबद्ध करण्यासाठी सीएसकेने त्याच्या ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीपेक्षा २.२ कोटी रुपये मोजले. सीएसकेने म्हटले आहे की ब्रेव्हिसला आयपीएल खेळाडू मार्गदर्शक तत्त्वे २०२५-२७ च्या कलम ६.६ नुसार, विशेषतः ‘रिप्लेसमेंट प्लेयर्स’ कलमानुसार करारबद्ध केले गेले आहे.
किमतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजासाठी आयपीएलच्या इतर काही संघांसोबत करण्यात आलेल्या वाटाघाटी फलदायी न होऊ शकल्याने सीएसके ब्रेव्हिसला करारबद्ध करण्यासाठी अधिक पैसे देण्यास तयार असल्याचे विधान अश्विनने केले होते. त्यानंतर वादाला तोंड फुटले होते.